AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदेंनी जीवाची बाजी लावून उठाव केला नसता तर…; मुनगंटीवार यांचा मित्र पक्षातील नेत्यांनाच टोला

Sudhir Mungantiwar on Shivsena Eknath Shinde Mahayuti : भाजप नेत्याचा टोला नेमका कुणाला?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उदाहरण देत म्हणाले... चंद्रपूरचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते नेमकं काय म्हणाले? वाचा...

शिंदेंनी जीवाची बाजी लावून उठाव केला नसता तर...; मुनगंटीवार यांचा मित्र पक्षातील नेत्यांनाच टोला
सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
| Updated on: Mar 25, 2024 | 3:45 PM
Share

भाजपचे वरिष्ठ नेते आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे आज वाशिममध्ये आहेत. सुधीर मुनगंटीवार हे आज वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी पोहरादेवी इथं जगदंबादेवी आणि संत सेवालाल महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी आले होते. पोहरादेवी येथील जगदंबा देवी दर्शन घेऊन मी पुढील प्रचाराला सुरुवात करत आहे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी पोहरादेवी इथं माध्यमांशी बोलत होते. पोहरादेवी इथं माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार यांनी विरोधकांवर टीका केली आहे. तसंच मित्रपक्षातील नेत्यांनाही टोला लगावला आहे.

मित्रपक्षांना कोपरखळी

राज्यात सर्वच मतदारसंघ भाजपला सोडणार तर मग मित्रांना काय देणार ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ असा भाव असला पाहिजे. मोठं मन ठेवावं लागतं. एकनाथ शिंदेंनी क्रांती केली नसती तर आपण मंत्री झालो असतो का? एकनाथ शिंदे यांनी जीवाची बाजी लावून उठाव केला, असं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.

काँग्रेसवर टीकास्त्र

काँग्रेसच्या चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी निवडणूक असल्याचं म्हणत भाजपवर टीका केली होती. त्यांच्या या व्यक्तव्याला सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी धानोरकर दाम्पत्यावर जहरी टीका केली आहे. हे काँग्रेसवाले लोक हे काय लोकशाही सांगणार यांनीच अन्याय केला. 19 महिने सामान्य लोकांना जेलमध्ये टाकून सख्या भावाबहिणींना नस बंदीसाठी कपडे काढून खाटेवर टाकलं. हजारो मुस्लिम बांधवांचे घरे तोडले. 5 वर्षाचा मुलासमोर त्याच्या पित्याला जळत्या ट्रकमध्ये टाकले. त्यांनी लोकशाहीच्या गोष्टी करणे म्हणजे मला आश्चर्य वाटतं, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुनगंटीवार आज वाशिम दौऱ्यावर

पोहरादेवी इथल्या भक्तीधाम इथं बंजारा समाजाचे पारंपरिक वाद्य हलगीवर बंजारा समाजाचे महंत जितेंद्र महाराज आणि सुधीर मुनगंटीवार यांनी ठेका धरला. स्थानिकांशी सुधीर मुनगंटीवार यांनी संवाद साधला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी महायुतीतील नेत्यांनाच त्यांनी कोपरखळी मारली. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंजगाच्या प्रश्नांवर सर्वच मतदार संघ भाजपला सोडणार तर मित्रांना काय देणार, असा सवाल मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.