AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?; Ashish Shelar यांचा संतप्त सवाल

हिंदू सणांच्या परवानगीवरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आघाडी सरकारने गुढीपाडव्याच्या शोभायात्रा आणि राम नवमीच्या मिरवणुकांबाबत अजूनही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.

हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?; Ashish Shelar यांचा संतप्त सवाल
हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?; Ashish Shelar यांचा संतप्त सवालImage Credit source: tv9 marathi
Reporter Rahul Zori
Reporter Rahul Zori | Edited By: | Updated on: Mar 29, 2022 | 2:21 PM
Share

मुंबई: हिंदू सणांच्या परवानगीवरून भाजपचे नेते आशिष शेलार (ashish shelar) यांनी महाविकास आघाडी (maha vikas aghadi) सरकारवर जोरदार टीका केली आहे. आघाडी सरकारने गुढीपाडव्याच्या शोभायात्रा आणि राम नवमीच्या मिरवणुकांबाबत अजूनही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे हिंदूंमध्ये (hindu) संभ्रमाचे वातावरण कायम आहे. जेव्हा जेव्हा हिंदू सणांना परवानगी देण्‍याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?, असा संतप्त सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. हिंदू नववर्षच्‍या निमित्‍ताने गुढीपाडव्‍याला निघणाऱ्या शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या मिरवणूका यांना परवानगी द्या, अशी मागणी शेलार यांनी विधानसभेत केली होती. त्‍यावेळेपासून आजपर्यंत याबाबत सरकारकडून कोणत्‍याही स्‍पष्‍ट सूचना आल्‍या नाहीत. त्‍यामुळे आज मीडियाशी बोलताना शेलार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.

मुंबई पोलीसांनी मुंबईत 10 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले असून त्‍यासाठी आतंकवादी, देशविरोधी शक्‍ती या ड्रोन, रिमोट कंट्रोलचा वापर करून हल्‍ला करतील अशी माहिती पोलिसांकडे आल्‍याचे ते सांगत आहेत. अशी माहिती आली असेल तर त्‍याबाबत सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी जरुर घ्‍यावी. या कारणाने मुंबईत जमावबंदीचे कमल लावण्‍यात आले आहे, असं शेलार यांनी सांगितलं.

शिवसेना बोटचेपी भूमिका का घेते?

मात्र याच काळात गुढीपाडवा आणि राम नवमीचे कार्यक्रम येतात. म्‍हणून आमचा सरकारला सवाल आहे की, हिंदू सणांचा विषय आला की सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो? आणि रामभक्‍तांचा विषय आला की शिवसेनेची बोटचेपी भूमिका का असते? असा सवाल त्यांनी केला. संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या दोन्‍ही सणांना परवानगी देण्‍यात याव्‍यात. या कार्यक्रमात खोडा टाकू नये. आम्‍ही या मंडळ व समित्‍यांसोबत चर्चा करीत असून या उत्‍सवात भाजपा सहभागी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

खोटं बोलणारी जमात वाढतेय

आदित्य ठाकरे म्हणजे मुंबई नव्हे, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे. भ्रष्टाचार मुक्तीला राज्यातील जनतेचं समर्थन आहे, असं ते म्हणाले. शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांच्या घड्याळ प्रकरणावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आईच्या नात्याला काळिमा लावू नका. कडवट हिंदूने ते करू नये. आईच्या नावाने खोटे बोलणारी जमात वाढत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

पटोले खोटं बोलणारी गुडिया

यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. खोटं बोलणारी गुडिया म्हणजे नाना पटोले. ती गुडिया चावी दिली की बोलते. त्याला जण समर्थन आणि जन भावना कधी नसते, असा टोला त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय, भाजप विरोधात एकत्र या, mamata banerjee यांचा एल्गार, पवारांसह गैरभाजप मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्रं

VIDEO: पवारांनी काय केलं ते सोडा, सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली?; अमोल मिटकरींची खोचक टीका

Maharashtra News Live Update : दिल्ली विधानसभा पेपरलेस होणार, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची घोषणा

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...