AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dosa Death Case : डोसे खाल्ल्यामुळे दोन बहि‍णींचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, आई-वडिल ICU मध्ये

Dosa Death Case : मागच्या आठवड्यात डोसा खाल्ल्यामुळे दोन निरागस मुलींचा मृत्यू झाला. आई-वडिलांची प्रकृती गंभीर असून ते रुग्णालयात असल्याची बातमी आली होती. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे.

Dosa Death Case : डोसे खाल्ल्यामुळे दोन बहि‍णींचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, आई-वडिल ICU मध्ये
Parents
| Updated on: Apr 10, 2026 | 11:54 AM
Share

मागच्या आठवड्यात डोसा खाल्ल्यामुळे दोन निरागस मुलींचा मृत्यू झाला. आई-वडिलांची प्रकृती गंभीर असून ते रुग्णालयात असल्याची बातमी आली होती. गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा भागात ही घटना घडली होती. डेअरीवरुन खीरू आणलं. डोसा बनवताना ते खीरु वापरलं. या खीरुमुळे कुटुंबाची प्रकृती बिघडली असं संशय मुलीच्या आजोबांनी व्यक्त केला होता. पोलिसांनी डेअरीवरुन ते खीरु तपासणीसाठी जप्त केलं होतं. आता या प्रकरणात चक्रावून सोडणारा खुलासा झाला आहे. सुरुवातीला या घटनेला फूड पॉयजनिंगशी जोडण्यात आलेलं. पण फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने हा तर्क फेटाळून लावला आहे. विषारी पदार्थ खाल्ल्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याच तपासातून समोर आलय. त्यामुळे पोलीस आता आत्महत्या आणि हत्या या अँगलने तपास करत आहेत.

तपास यंत्रणांकडून मुलींचे आई-वडिल विमल प्रजापती आणि आई भावना प्रजापती यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात विषारी तत्व आढळून आलं. हे विषारी घटक सल्फास नावाच्या किटकनाशकात आढळतात. धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. पोलिसांना विमलच्या घरात सल्फासच्या गोळ्या सापडल्या. त्यांची तपासणी सुरु आहे.

डोशामध्ये विष मिसळलेलं होतं की..

मुलींचा मृत्यू हा डोसा खाल्ल्यामुळे झालेला नाही हे यातून स्पष्ट झालय. विषारी पदार्थ याला जबाबदार आहे. 1 एप्रिलच्या रात्री विमल डेअरीमधून डोसा तयार करण्यासाठी खीरु घेऊन आला. त्यानंतर कुटुंबाने डोसे खाल्ले. डोशामध्ये विष मिसळलेलं होतं की, अन्य कुठल्या मार्गाने ते शरीरात पोहोचलं यावर आता तपास केंद्रीत झाला आहे.

कौटुंबिक पार्श्वभूमी पोलिसांच्या रडारवर

विषयाचं गांभीर्य लक्षात घेता गुन्हे शाखेने मेडिकल स्टोर आणि सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरु केलाय. भावना प्रजापती यांच्या वडिलांचं मेडिकल स्टोर आहे. त्यामुळे विषारी घटकाचा स्त्रोत तिथूनच आलेला असू शकतो असा पोलिसांना संशय आहे. गुन्ह्याच्या मूळापर्यंत पोहोचण्यासाठी आसपास कॅमेऱ्यांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी सुद्धा पोलिसांच्या रडारवर आहे.

आजी-आजोबांची कसून चौकशी

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार विमल प्रजापती बऱ्याच काळापासून बेरोजगार होता. मॉडलिंगमध्ये करिअर करण्याचा त्याचा प्रयत्न होता. ऑस्ट्रेलियाला जायचही त्याचं प्लानिंग होतं. आर्थिक विवंचना आणि घरगुती तणाव या गोष्टी सुद्धा समोर आल्या आहेत. दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर तणाव वाढला. पोलिसांकडून आजी-आजोबांची कसून चौकशी सुरु आहे. पोलिसांच्या मते या गुन्ह्यात आई-वडिल किंवा कुटुंबातील कुठला जवळचा व्यक्ती सहभागी असू शकतो. सध्या विमल आणि भावना आयसीयूमध्ये आहेत.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप