भारत-बांगलादेश सीमेवरुन घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय लष्कराच्या कारवाईत ठार
भारत-बांगलादेश सीमेवर सध्या हाय अलर्ट आहे. कुणीही भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला भारतीय जवान चोख प्रत्यूत्तर देतात. अशीच एक घटना सोमवारी मध्यरात्री घडली. जेव्हा काही लोकांनी भारतीय सीमेत घुसखोरी केली. भारतीय जवानाने केलेल्या गोळीबारात घुसखोर ठार झाला.

भारत आणि बांगलादेश सीमवेर सध्या हायअलर्ट आहे. शेख हसीना यांच्या सरकारविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले होते. इतकंच नाही तर त्यांना स्वरक्षणासाठी देश देखील सोडावा लागला होता. त्यानंतर भारत आणि बांगलादेश सीमेवर हायअलर्ट घोषित करण्यात आला होता. कारण बांगलादेशमधून घुसखोरीचा प्रयत्न केला जाऊ शकतो अशी शक्यता आहे. या दरम्यान पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर सोमवारी मध्यरात्री विडी पानांची तस्करी करण्याचा प्रयत्न करत असताना बीएसएफने केलेल्या गोळीबारात एक बांगलादेशी तस्कर ठार झालाय. हा तस्कर इतर काही बांगलादेशी तस्करांच्यासह बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीरपणे घुसला होता. त्यानंतर पश्चिम बंगालमधून बांगलादेशात बिडीची पाने घेऊन जाण्याच्या प्रयत्नात तो बीएसएफने केलेल्या कारवाईत तो ठार झाला.
बीएसएफ जवानांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने त्याच्या साथीदारांसह बीएसएफ जवानावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. स्वसंरक्षणार्थ गोळीबारात एक तस्कर ठार झाला, बाकीचे दाट झाडी आणि अंधाराचा फायदा घेत बांगलादेशात पळून गेले. बांगलादेशी तस्कर ठार झाल्याची घटना बऱ्याच दिवसांनी समोर आली आहे.
बीएसएफने सांगितले की, तपासादरम्यान मृत बांगलादेशी तस्कराचे नाव अब्दुल्ला असल्याचे समोर आले आहे. तो बांगलादेशातील चापैनवाबगंज जिल्ह्यातील सीमेवरील ऋषीपाडा गावचा रहिवासी होता. आंतरराष्ट्रीय सीमेपासून साडेचार किलोमीटर अंतरावर ऋषीपाडा गाव बांगलादेशात आहे. मृत तस्कर बॉर्डर गार्डने बांगलादेशचा सुरक्षा घेरा ओलांडून बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. येथून तो विडी बनवण्यासाठी पाने घेऊन बांगलादेशला जात होता. काही हजार रुपये किमतीची ही पाने त्याने चार-पाच बॅगांमध्ये भरली होती.
बीएसएफ दक्षिण बंगालचे डीआयजी एके आर्य म्हणाले की, बांगलादेशी तस्करांकडून बीएसएफ जवानावर हल्ला होण्याची ही काही वेगळी घटना नाही. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि मालदा जिल्ह्यांमध्ये, प्रादेशिक मुख्यालय बेरहामपूर आणि मालदा, नटाना फॉरवर्ड, कहारपारा, अनुराधापुरा आणि उत्तर 24 परगणा आणि नादिया जिल्ह्यांच्या सीमा चौक्यांवर आणि कोलकाता आणि कृष्णनगर या प्रादेशिक मुख्यालयाच्या अंतर्गत घोजाडंगा आणि महेंद्राच्या सीमा चौक्यांवर, बांगलादेशी तस्कर आणि अवैध तस्करांनीही सैनिकांवर हल्ले केले होते.
जिथे सैनिकांना स्वसंरक्षणार्थ तस्कर आणि अवैध घुसखोरांवर स्टन ग्रेनेड, PAG आणि इतर कारवाई करावी लागते. बॉर्डर गार्ड्स बांगलादेश (BGB) सोबत ध्वज बैठका देखील आयोजित केल्या जातात. मात्र त्यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने बांगलादेशी तस्करांचे मनोधैर्य वाढत आहे. परंतु बीएसएफचे जवान भारतीय सीमांचे रक्षण करण्यात आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या देशाची सुरक्षा सुनिश्चित करतात.
