BIG News: कोण आहेत IPS अरविंद नेगी ज्यांनी लष्कर ए तोयबाला संवेदनशिल माहिती पुरवल्याचा आरोप आहे !
गेल्या वर्षभरापासून अरविंद नेगी हे एनआयएच्या रडारवर होते. त्यांच्यावर संशय आला त्यावेळेस त्यांना पुन्हा हिमाचल प्रदेशला म्हणजे मुळ कॅडरला पाठवलं गेलं. आणि शेवटी त्यांना काल अटक केली गेली. नेगी हे शिमल्यात एसपी म्हणून कार्यरत होते.

राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएनं (NIA) एका आयपीएस (IPS) रँकच्या अधिकाऱ्याला अटक केलीय. अरविंद दिग्विजय नेगी असं अधिकाऱ्याचं नाव असून तो हिमाचल प्रदेश कॅडरचा आहे. विशेष म्हणजे आयपीएस नेगीनं एनआयएमध्ये 11 वर्ष काम केलेलं आहे. 2017 साली नेगीला उत्तम कामगिरीसाठी गॅलंट्री अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आलं आहे. त्याच स्वत:च्याच संस्थेत दिर्घकाळ काम केलेल्या नेगीला अटक करण्याची वेळ एनआयएवर आलीय. हे तेच नेगी आहेत ज्यांनी हुर्रीयत कॉन्फरन्सच्या टेरर फंडीगचा (Terror Funding) तपास केला होता. आणि त्यांच्यावरच लष्कर ए तोयबाला संवेदनशिल माहिती पुरवल्याचा आरोप आहे.
कोण आहेत IPS अरविंद दिग्विजय नेगी? आयपीएस अरविंद नेगी हे हिमालच प्रदेश कॅडरचे अधिकारी आहेत पण ते प्रमोटी आहेत. म्हणजेच ते थेट आयपीएस झालेले नाहीत- 2011 मध्ये त्यांचं प्रमोशन झालं आणि ते NIA मध्ये एसपी रँकचे अधिकारी म्हणून ज्वाईन झाले. विशेष म्हणजे लष्कर ए तोयबाला अशी माहिती पुरवली जात असल्याची कुणकुण एनआयएला आलेली होती. तशी केस 6 नोव्हेंबर 2021 साली नोंदवली गेलीय. गेल्या वर्षभरापासून अरविंद नेगी हे एनआयएच्या रडारवर होते. त्यांच्यावर संशय आला त्यावेळेस त्यांना पुन्हा हिमाचल प्रदेशला म्हणजे मुळ कॅडरला पाठवलं गेलं. आणि शेवटी त्यांना काल अटक केली गेली. नेगी हे शिमल्यात एसपी म्हणून कार्यरत होते. ओजीडब्ल्यू म्हणजे लष्कर ए तोयबाला दहशतवादी घटना घडवण्यासाठी मदत करणारं नेटवर्क आहे, त्यालाच संवेदनशिल माहिती नेगींनी पुरवल्याचा आरोप आहे. याच केसमध्ये एनआयएनं 6 आरोपींना अटक केलीय. नेगींच्या शिमल्यातल्या घराची एनआयएनं झडती घेतलीय. त्यात लष्कर ए तोयबाच्या खास माणसाला संवेदनशिल डॉक्युमेंट दिल्याचेही पुरावे एनआयएला मिळालेत. अरविंद नेगी यांनी 11 वर्षांच्या एनआयएतील कारकिर्दीत हुर्रीयत टेरर फंडींग, तसच काश्मीरमधील मानवी हक्कासाठी लढणाऱ्या आणि त्याच्या नावावर पैसा गोळा करुन टेरर घटना घडवणाऱ्या संघटनांच्या केसेसचा तपासही नेगीनं केलेला आहे.
काही हायप्रोफाईल केसचाही तपास काही वर्षापुर्वीचं डीएसपी देविंदर सिंगचं प्रकरण आठवतंय? डीएसपी देविंदरसिंगला अटक करण्यात आली होती कारण हाच देविंदरसिंग हिजबुल मुजाहिदीनच्या काही अतिरेक्यांना जम्मूला घेऊन जात असताना पकडला गेला होता. याच घटनेत पीडीपी नेता वाहिद पारालाही अटक केली गेली होती. त्या केसचा तपासही अरविंद नेगीकडं होता. एवढच नाही तर इसिसमधल्या अतिरेक्यांच्या भरतीची केसही नेगीनेच हँडल केलेली आहे. त्यामुळे एका आयपीएस रँकच्या अधिकाऱ्याची अटक देशभरातल्या पोलीस संस्थांना धक्का देणारी आहे.
हे सुद्धा वाचा: दहशतवादी संघटनेशी संबंध, जम्मू काश्मीरच्या राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी
टेरर फंडिंग प्रकरण: जमात-उद-दावाच्या सहा दहशतवांद्यांची निर्दोष मुक्तता
