AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संकटात मोदी सरकारची अत्यंत मोठी घोषणा, थेट उडाली खळबळ, साखरेच्या निर्यातीवर..

इराण आणि अमेरिका युद्धादरम्यान धक्कादायक निर्णय घेतले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने न खरेदी करण्याचे मोठे आवाहन जनतेला केले. यादरम्यानच आता अत्यंत मोठा निर्णय सरकारकडून जारी करण्यात आला. ज्याने एकच खळबळ उडाली.

संकटात मोदी सरकारची अत्यंत मोठी घोषणा, थेट उडाली खळबळ, साखरेच्या निर्यातीवर..
Prime Minister Narendra Modi
| Updated on: May 14, 2026 | 7:53 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. मात्र, याचे अत्यंत गंभीर परिणाम भारतात बघायला मिळत आहेत. केंद्र सरकार एका मागून एक मोठे निर्णय घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल, डिझेलचा कमी वापर करण्याचे आवाहन केले. यासोबतच विदेश यात्रा टाळण्यावरही त्यांनी भाष्य केले. सर्वात मोठे म्हणजे पुढील 1 वर्षापर्यंत सोने न खरेदी करण्याचे मोठे आवाहन त्यांनी केले. या आवाहनानंतर 24 तासाच्या आत सोन्यावरील 6 टक्के आयात कर थेट 15 टक्क्यांवर केला. ज्याने भारतीय बाजारात थेट सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली. यादरम्यानच आता अजून एक मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून थेट आदेश काढली आहेत. केंद्र सरकारने एक मोठी घोषणा करत साखरेच्या निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. कच्ची, पांढरी आणि यासोबतच शुद्ध साखरेच्या निर्यातीवर सप्टेंबर 2026 पर्यंत प्रतिबंधित असेल. यावरील बंदी पुढेही ढकलली जाऊ शकते.

सरकारने हा निर्णय देशातील साखरेचे भाव नियंत्रणात ठेवण्याकरिता घेतल्याचे कळत आहे. हा सरकारचा अत्यंत मोठा निर्णय असल्याचे सांगितले जात आहे. भारत हा मोठ्या प्रमाणात इतर देशात साखरे निर्यात करतो. मात्र, आता निर्यातीवर बंदी घालण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून इराण आणि अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून अत्यंत मोठे निर्णय घेतले जात आहेत. ज्याचा परिणाम थेटपणे होताना दिसत आहे.

घरगुती वापरण्याचे तेलही बचत करून वापरावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले. त्याबाबत सरकार मोठा निर्णय घेऊन शकतो, असा अंदाज होता. मात्र, सरकारने थेट साखरेबाबत हा निर्णय घेतला. इराण आणि अमेरिका युद्ध काही दिवस अजून पुढे चालले तर त्याचा परिणामांना भारतीयांना सामोरे जावे लागेल. सरकार एका मागून एक धक्कादायक निर्णय घेताना दिसत आहे. सरकारच्या या निर्णयाने अनेकांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय.

ही बंदी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत आहे. पुढील आदेश येऊपर्यंत बंदी कायम राहणार आहे. या अधिसूचनेत कच्ची साखर, पांढरी साखर आणि शुद्ध साखर यांचा समावेश आहे. या निर्यात बंदीमुळे देशांतर्गत पुरवठा सुधारेल आणि किमती नियंत्रणात राहतील, असे सांगितले जात आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.