AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Congress : काँग्रेस कार्यकारिणीची बैठक: सोनिया गांधी म्हणाल्या, ही वेळ पक्षाची ऋण फेडण्याची

राजकारण, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, अर्थव्यवस्था, संघटना, शेतकरी, कृषी, युवक आणि सशक्तीकरण या विषयांवर सहा गटांमध्ये चर्चा केली जाईल, असे सोनिया गांधी यांनी सांगितले. तसेच त्या म्हणाल्या की, पक्षाने नेहमीच आपल्या सर्वांचे भले केले आहे. आता ऋण फेडण्याची वेळ आली आहे.

Congress : काँग्रेस कार्यकारिणीची बैठक: सोनिया गांधी म्हणाल्या, ही वेळ पक्षाची ऋण फेडण्याची
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीImage Credit source: tv9
| Updated on: May 09, 2022 | 8:16 PM
Share

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यातील निवडणूकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला. त्यानंतर या पाच राज्यात काँग्रेसने वरिष्ठ पातळीवर मोठे बदल केले. तसेच निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Election Strategist Prashant Kishor) यांच्याशी ही बोलणी करत पक्षात प्रवेशासाठी प्रयत्न केले गेले. मात्र ऐनवेळी माशी शिंकली आणि प्रशांत किशोर यांनी लांबूनच हात जोडले. त्यामुळे पक्षाला चार्ज करण्याची धुरा स्वत: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) घेतली. त्यामुळे वाईट अवस्थेतून जात असलेला काँग्रेस पक्ष आता सक्रिय अवस्थेत आला आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक सुरू आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Former Congress President Rahul Gandhi), राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत.

तसेच सीडब्ल्यूसीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, आमचे सुमारे ४०० सहकारी उदयपूरमध्ये आयोजित चिंतन शिबीरात सहभागी होतील. त्यांच्यापैकी बहुतेकांनी पक्षाच्या संघटनेत किंवा केंद्रातील सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. काँग्रेस पक्षाचे ऋण आपण सर्वांनी फेडण्याची हीच वेळ असल्याचे त्या म्हणाले. तसेच अशा परिस्थितीत त्यांना कोणताही स्वार्थ न ठेवता आणि शिस्तीने काम करावे लागते. पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी कोणतीही जादूची कांडी नाही. एकत्र काम करावे लागेल असेही त्या म्हणाल्या.

सीडब्ल्यूसीच्या बैठकीत त्या म्हणाल्या की, उदयपूरमध्ये 13 ते 15 मे रोजी होणारा ‘नवसंकल्प चिंतन शिविर’ हा निव्वळ कार्यक्रम नसावा. त्यातून पक्षाच्या पुनर्रचनेचे प्रतिबिंब उमटले पाहिजे. या शिबिरात सुमारे 400 लोक सहभागी होत असून यातील बहुतांश जण संघटनेत कोणत्या ना कोणत्या पदावर किंवा सरकारमध्ये पदे भूषविली आहेत. राजकारण, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, अर्थव्यवस्था, संघटना, शेतकरी, कृषी, युवक आणि सशक्तीकरण या विषयांवर सहा गटांमध्ये चर्चा केली जाईल, असे सोनिया गांधी यांनी सांगितले. तसेच त्या म्हणाल्या की, पक्षाने नेहमीच आपल्या सर्वांचे भले केले आहे. आता ऋण फेडण्याची वेळ आली आहे.

तत्पूर्वी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल, अजय माकन आणि अशोक गेहलोत यांनी बुधवारी चिंतन शिबिराच्या तयारीचा आढावा घेतला. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या सूचनांचा विचार केल्यानंतर काही दिवसांनी, काँग्रेसने पुढील लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाला बळकट करण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी ‘प्रिव्हिलेज्ड वर्किंग ग्रुप- 2024’ ची स्थापन केली जाईल, अशी घोषणा देखील यावेळी करण्यात आली. मात्र त्यानंतर प्रशांत किशोर यांनी काँग्रेसने पक्षात प्रवेश करण्याची आणि पक्षाची निवडणूक रणनीती तयार करण्याची ऑफर नाकारली. 2023 मधील इतर राज्यांच्या निवडणुका आणि 2024 मधील लोकसभा निवडणुकांबरोबरच या वर्षाच्या अखेरीस गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.