भाजपकडून कोरोना महामारीचा राजकीय वापर, काँग्रेसचा गंभीर आरोप

भाजपने कोरोना महामारीचा राजकीय वापर केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी केलाय.

भाजपकडून कोरोना महामारीचा राजकीय वापर, काँग्रेसचा गंभीर आरोप
सागर जोशी

|

Jan 05, 2021 | 2:27 PM

नवी दिल्ली: कोरोना महामारी आणि कोरोना लसीवरुन काँग्रेसनं पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपने कोरोना महामारीचा राजकीय वापर केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी केलाय. तसंच कोरोना लसीवरुन निर्माण झालेल्या वादावरुनही त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. (Congress makes serious allegations against BJP)

‘कोरोनाची ही सल कोण घेईल? जिच्या विश्वसनियतेवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्या कंपनीने संशोधन आणि विकासात कोट्यवधी रुपयांची गुंतणवूक केली आहे. भाजप सरकारने त्या कंपनीसाठी एक महान काम केलं आहे. आत्मनिर्भर भारताच्या नावाखाली सरकारने एका अशा कंपनीच्या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे, ज्या लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पाही पूर्ण झालेला नाही’, अशा शब्दात मनिष तिवारी यांनी केंद्र सरकावर जोरदार टीका केलीय.

काँग्रेस नेत्यांचं कोरोना लसीवर प्रश्नचिन्ह?

मनिष तिवारी यांच्यापूर्वीही काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी कोरोना लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यात शशी थरुर, जयराम रमेश यांच्यासारख्या नेत्यांचाही समावेश आहे. ‘भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अद्याप पूर्ण झालेली नाही. अशावेळी या लसीच्या वापरासाठी मंजुरी देणं अत्यंत धोकादायक आहे’, असं ट्वीट शशी थरुर यांनी केलं आहे.

माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनीही भारत बायोटेकच्या कोरोना लसीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. “भारता बायोटेक ही एक उत्तम गुणवत्ता असणारी आणि विश्वासार्ह कंपनी आहे. मात्र या कंपनीने तयार केलेल्या लसीच्या फेज-3 च्या ट्रायलसाठी प्रक्रियेच्या मूळ नियमांत बदल करण्यात येत आहेत. हे चकित करणारं आहे.  आरोग्यमंत्र्यांनी यावर उत्तर द्यावं’, अशी मागणी रमेश यांनी ट्विटरवरुन केलीय.

संबंधित बातम्या:

केंद्राचा मोठा निर्णय, कोव्हिशील्ड लस तूर्तास भारतीयांनाच, निर्यातीवर बंदी

सरकारने सीरम लसीसाठी केली 6.6 कोटींची डील, 200 रुपयांना मिळणार एक डोस

Congress makes serious allegations against BJP

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें