AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झटक्यात चष्मा लावणं बंद झालं असतं, या आय ड्रॉपचे काही थेंब… पण आय ड्रॉपबाबत काय घडलं?

या अनोख्या आय डॉप्सच्या निर्मिती प्रक्रीयेला पेटेंट मिळण्यासाठी अर्ज केला आहे असे या आय ड्रॉपच्या निर्मात्यांनी म्हटले आहे. या ड्रॉप्सचा फॉर्म्युला केवळ वाचणाचा चष्मा दूर करत नाही तर डोळ्यांच्या लुब्रिकेशनचे देखील काम करतो. या आय ड्रॉप्समध्ये आधुनिक डायनामिक बफर तंत्रज्ञान असल्याचा दावा या कंपनीने केला आहे.

झटक्यात चष्मा लावणं बंद झालं असतं, या आय ड्रॉपचे काही थेंब... पण आय ड्रॉपबाबत काय घडलं?
Entod Pharmaceuticals' PresVu eye drops banned by CDSCO
| Updated on: Sep 11, 2024 | 9:12 PM
Share

चष्म्याचा नंबर घालविण्याचा दावा करणाऱ्या एका आय ड्रॉपला भारतीय बाजारात उतरविण्यापूर्वीच बंदी आली आहे. कंपनीने असा दावा केला होता की या आय ड्रॉपने नजरेचा चष्मा दूर होण्यास मदत मिळेल. भारतीय औषध नियामक एजन्सीने या आय ड्रॉपला मंजूरी देखील दिली होती. परंतू आता CDSCO ने मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया हे आजार दूर करण्याचा दावा करणाऱ्या या आय ड्रॉपवर नोटीसीला उत्तर मिळेपर्यंत बंदी घातली आहे.

मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया या आजारावर उपचार करण्यासाठी मुंबई स्थित एन्टोड ( ENTOD) फार्मास्यूटिकल्स या कंपनीने PresVu नावाने एक आयड्रॉपची निर्मिती केली होती. याच्या नियमित वापराने नजरेचा चष्मा दूर होऊ शकतो असे म्हटले जात होते.

सेंट्रल ड्रग्स स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO)च्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमेटी (SEC) द्वारा आधी या उत्पादनाची शिफारस केल्यानंतर ENTOD फार्मास्यूटिकल्सला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI)अंतिम मंजूरी देखील दिली होती. परंतू या कंपनीने आपल्या आय ड्रॉपच्या (1.25% पिलोकार्पाइन w/v) अशा प्रकारच्या भ्रामक दावा करण्याच्या प्रचाराची दखल घेत नियामक संस्थेचा पुढील आदेश मिळत बंदी घातली आहे.

आय ड्रॉपवर यासाठी बंदी

या आय ड्रॉप कंपनी सोशल मिडिया आणि अनधिकृत प्रचारामुळे या आय ड्रॉपने चष्मा लावणाऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे या आय ड्रॉपच्या असुरक्षित उपयोग आणि जनतेच्या सुरक्षेबाबत नियामक एजन्सीचे टेन्शन वाढले.कारण या आय ड्रॉपला डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असेल तर देण्याची मंजूरी मिळाली होती. म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने हे औषध मिळणार होते. परंतू त्याची जाहीरात अशी केली गेली जसे प्रत्येकजण याचा वापर करून आपला चष्म्याचा नंबर घालविण्याचा प्रयत्न करेल. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून प्रिस्क्रिप्शन-आधारित या आय ड्रॉप्सची 350 रुपयांना मेडीकल फार्मसीत विक्री होणार होती.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.