AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपड्यांसाठी वॉशिंगमशीन, चपात्या तयार करण्याचंही मशीन, गरजा भागवण्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांकडून आधुनिक यंत्रणांचा वापर

आंदोलक शेतकरी आपल्या रोजच्या दैनिक गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे (Protester Farmers using roti maker to washing machine).

कपड्यांसाठी वॉशिंगमशीन, चपात्या तयार करण्याचंही मशीन, गरजा भागवण्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांकडून आधुनिक यंत्रणांचा वापर
| Updated on: Dec 12, 2020 | 10:26 PM
Share

नवी दिल्ली : शेतात राबणारा शेतकरी आज हजारोंच्या संख्येने दिल्लीच्या सिंधू बॉर्डरवर उभा आहे. मातीशी एकरुप असलेल्या शेतकऱ्याने केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात एल्गार पुकारला आहे. गेल्या पंधरा पेक्षा जास्त दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन आणखी बरेच दिवस चालण्याची शक्यता आहे. हे आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत पूर्ण दिवस टिकावं यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्रणांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. आंदोलक शेतकरी आपल्या रोजच्या दैनिक गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे (Protester Farmers using roti maker to washing machine).

चपात्या तयार करण्याचं मशीन

मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन करणार, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या आंदोलनाला भरपूर दिवस लागतील हे गृहित धरुनच शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात आपल्या गरजांना भागवण्यासाठी शेतकरी आधुनिक यंत्रणांचा वापर करत आहेत. शेतकरी चपाती करण्यासाठी मशीनचा वापर करत आहेत.

वॉशिंग मशीनचा वापर

शेतकऱ्यांचं गेल्या दोन आठवड्यापासून आंदोलन सुरु आहे. या दोन महिन्यात अनेकांचे कपडे मळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपडे धुण्याची व्यवस्था केली आहे. त्यांनी आंदोलनस्थळी वॉशिगमशीनची व्यवस्था केली आहे. हे मशीन ट्रॅक्टर आनि ब्रॅट्री यांच्याद्वारे चालवलं जात आहे (Protester Farmers using roti maker to washing machine).

मोबाईलची नियमित चार्जिंग

आंदोलक शेतकरी आपलं घरदार सोडून दिल्ली सीमेवर आले आहेत. आपल्या मागण्यांवर ते ठाम आहेत. आणखी किती दिवस हे आंदोलन चालेल ते त्यांना माहिती नाही. मात्र, या दरम्यान ते आपल्या कुटुंबियांची देखील काळजी घेतात. आपल्या कुटुबियांशी सतत बोलता यावं यासाठी शेतकरी मोबाईल चार्ज करुन ठेवत आहेत.

थंडीपासून बचावासाठी उपाय

सध्या थंडीचे दिवस आहेत. पंजाब, हरियाणा आणि दिल्लीत या दिवसांमध्ये प्रचंड थंडी असते. ही थंडी पुढच्या काही दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या लवकर पूर्ण झाल्या नाहीत तर त्यांना थंडीचा सामना करावा लागेल. दरम्यान, सध्या थंडीपासून बचाव व्हावा यासाठी त्यांनी त्यांच्या ट्रॅक्टरवर ताडपत्री अंथरली आहे.

शेतकऱ्यांना पुरवल्या जातात चपाती

काही लोकांनी आंदोलक शेतकऱ्यांसाठी चपात्यांची व्यवस्था केली आहे. चपाती बनवणाऱ्या मशिन ठिकठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. या मशिनद्वारे ज्या चपाती बनवल्या जातात त्या दररोज 1500 ते 2000 शेतकऱ्यांना वाटल्या जात आहेत.

शेतकऱ्यांची संख्या वाढती, दिल्लीत घुसण्याची धमकी

शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु व्हायला 15 दिवसांपेक्षाही जास्त कालावधी झाला आहे. मात्र, जसजसे दिवस वाढत आहेत तसतसी शेतकऱ्यांची संख्यादेखील वाढत आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत दिल्ली-जयपूर रोड अडवू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या या भूमिकेवरुन पोलीस देखील हाय अलर्टवर आहेत. शेतकऱ्यांनी दिल्लीत शिरण्याची धमकी दिल्याने पोलीसदेखील सतर्क आहेत.

संबंधित बातम्या

Kisan Andolan : कृषी कायद्याविरोधात आंदोलन आणखी पेटणार, 1500 ट्रकसह 30,000 शेतकरी दिल्लीत धडकणार

‘अहंकाराची खुर्ची सोडा आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क द्या’, कृषी कायद्यांवरुन राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा.