AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र आणि राज्य सरकारांनो जागे व्हा; कर्तव्य पार पाडा; सोनिया गांधींचं आवाहन

देशभरात कोरोनाचं प्रचंड संकट निर्माण झाल्याने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यावर चिंता व्यक्त केली आहे. (Government Should Wake Up..., Sonia Gandhi On Covid Spike In India)

केंद्र आणि राज्य सरकारांनो जागे व्हा; कर्तव्य पार पाडा; सोनिया गांधींचं आवाहन
sonia gandhi
| Updated on: May 01, 2021 | 2:35 PM
Share

नवी दिल्ली: देशभरात कोरोनाचं प्रचंड संकट निर्माण झाल्याने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यावर चिंता व्यक्त केली आहे. कोरोना महामारीच्या संकटात तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करते. ज्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्ती गमावला त्या लाखो कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करते. देशावासियांसाठी हा संकटाचा काळ आहे. आपण एकमेकांचा हात पकडून पुढे गेलं पाहिजे, असं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं आहे. तसेच कोरोनाचं संकट वाढलं असून आता केंद्र आणि राज्य सरकारांनी जागं व्हावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. (Government Should Wake Up…, Sonia Gandhi On Covid Spike In India)

सोनिया गांधी यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे हे आवाहन केलं आहे. सध्याची परिस्थिती मानवतेला हादरवणारी आहे, हे मला माहीत आहे. काही ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे. तर काही ठिकाणी आयसीयू बेड्सची टंचाई आहे. ही परीक्षेची वेळ आहे. एकमेकांना मदत करा. आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडा. घरी आणि बाहेर दोन्ही ठिकाणी सावध राहण्याची गरज आहे, असं सांगतानाच कमी वेळात सर्वांना व्हॅक्सिन मिळावी म्हणून सर्व राज्यांमध्ये व्हॅक्सिनशी संबंधित लायसन्स द्यायला हवेत, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

केंद्राने जागे व्हावं

यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारांना जागे होण्याचं आवाहनही केलं. केंद्र आणि राज्य सरकारांनी आता जागे व्हावे. आपलं कर्तव्य पार पाडावे, असं आवाहन करतानाच सरकारने सर्वात आधी गरिबांचा विचार करावा. तसेच लोकांचं स्थलांतर थांबवावं. गरीबांच्या खात्यामध्ये किमान 6 हजार रुपये जमा करावेत, अशी मागणी त्यांनी केली. कोरोना चाचण्या वाढवा, ऑक्सिजन, औषधांचा साठा युद्ध पातळीवर पुरवा, मोफत लसीकरणाची व्यवस्था करा, कोरोना लसीच्या किंमतींमधील तफावत दूर करा, अशी मागणीही त्यांनी केली.

एकजूटता हाच मंत्र

एकजूट राहणे हाच सध्याच्या परिस्थितीत सर्वात मोठा मंत्र आहे. आपल्या देशाने यापूर्वी अनेक मोठ मोठ्या संकटाचा सामना केला आहे. त्यामुळे कोरोनाचं संकटाचं गांभीर्य ओळखून एक नागरिक म्हणून प्रत्येकांना संपूर्ण योगदान द्यावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

आधीही टीका

याआधी सोनिया गांधी यांनी कोरोना महामारीवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. लोकांचा जीव वाचवायचा आहे, एवढंच सरकारनं लक्षात ठेवावं. ही वेळ राजकारण करण्याची नाही. तर सर्वांनी मिळून काम करण्याची आहे. हवं तर पंतप्रधानांनी सर्व क्रेडिट घ्यावं. त्यात काही नवं नाही. मात्र, सरकारने पावलं उचलावीत, असं सोनिया गांधी म्हणाल्या होत्या. (Government Should Wake Up…, Sonia Gandhi On Covid Spike In India)

संबंधित बातम्या:

शाहबुद्दीन साक्षात जिवंत, तिहार जेलचं स्पष्टीकरण, मृत्यूच्या बातमीनं दिल्ली ते बिहार सावळा गोंधळ

 देशात चार लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण, एका दिवसात 3 हजार 523 कोरोनाबळी

येत्या दोन-तीन दिवसांत देशातील कोरोना संसर्ग शिगेला पोहोचणार; शास्त्रज्ञांचा अंदाज

(Government Should Wake Up…, Sonia Gandhi On Covid Spike In India)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.