AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्पा सेंटरमध्ये नको खेळ! ग्राहक म्हणून पोहोचले पोलीस, आक्षेपार्ह अवस्थेत दोघे…, प्रकरण जाणून व्हाल थक्क

स्पा सेंटरच्या नावाखाली काय सुरु होता प्रकार? पोलिसांना नको त्या आवस्थेत आढळले दोघे... तिघांना अटक, काय आहे प्रकरण जाणून व्हाल थक्क....

स्पा सेंटरमध्ये नको खेळ! ग्राहक म्हणून पोहोचले पोलीस, आक्षेपार्ह अवस्थेत दोघे..., प्रकरण जाणून व्हाल थक्क
| Updated on: Jul 19, 2025 | 8:37 AM
Share

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. ग्राहकांच्या वेशात पोलीस पोहोचल्यानंतर स्पा मालकांचं सत्य समोर आलं आहे. गुरुग्राम पोलिसांनी मानेसरमधील एका इमारतीतील दोन स्पामध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करताना तीन जणांना अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएमटी मानेसरच्या सेक्टर-2 मध्ये असलेल्या आम्रपाली इमारतीत ऑस्कर आणि गोल्डन ग्रॅव्हिटी नावाचे दोन स्पा असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली, ज्यामध्ये काही महिला स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवत असल्याचं कळताच पोलिसांनी कारवाई केली.

वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्ही आमच्या एका अधिकाऱ्याला बनावट ग्राहक तयार करून दोन्ही स्पा सेंटरमध्ये पाठवलं. त्यानंतर बोलणी झाली महिलांची मागणी केली. अखेर करार ठरला आणि त्या स्पामध्ये एका कपलला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं…’

स्पावर छापा, एका महिलेसह तिघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘स्पामध्ये पाठवलेल्या अधिकाऱ्याने संकेत दिल्यानंतर आम्ही छापा टाकला आणि एका महिलेसह तिघांना अटक केलं.’ ऑस्कर स्पाचे व्यवस्थापक महेंद्र कुमार, स्पाचा ग्राहक सुरजीत आणि गोल्डन ग्रॅव्हिटी स्पाची मालकीण आशिया खातून अशी आरोपींची ओळख पटली आहे.

मॅनेजर आणि महिलेने सेक्स रॅकेट चालवल्याची कबुली दिली

दोन्ही स्पा सेंटरमध्ये उपस्थित असलेल्या महिलेने वेश्याव्यवसाय सुरु असल्याची कबुली दिली आहे. ही पहिली वेळ नाही, जेव्हा पोलिसांनी स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडफोड केला आहे. याआधी देखील पोलिसांनी व्यवसायात बळजबरी अडकवण्यात आलेल्या मुलींची सुटका केली आहे.

गेल्या वर्षी शहरातील पोलिसांनी, एका हॉटेलमधून विदेशी महिलांसह 10 लोकांना अटक केली होती. अटक केलेल्या सहा महिलांपैकी बांगलादेश आणि उझबेकिस्तानमधील प्रत्येकी दोन महिला होत्या. ज्यांनी वेश्याव्यवसायात सहभागी असल्याचं कबूल केलं. सध्या पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहे. शिवाय बळजबरी अडकवण्यात आलेल्या मुलींच्या सुटकेसाठी देखील मोठी भूमिका बजावत आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.