काँग्रेसमध्ये भूकंप? चिदंबरम पण थरूर यांच्या वाटेवर… INDIA आघाडीवरील त्या वक्तव्याने आग, दक्षिणेतील राजकारणात काही मोठे घडणार?
P Chidambaram on India Alliance : मोदी सरकारच्या पाकिस्तानविरोधातील खमकी कारवाईचे सर्वांनीच कौतुक केले. तर युद्ध विरामावर काही पक्ष नाराज झाले. त्यातच काँग्रेसच्या पक्षीय भूमिकेविरोधात बडे नेते विधान करत असल्याने राजकीय पडद्याआड काही शिजतंय का? असा सवाल उपस्थित होत आहे.

पाकिस्तानविरोधात लष्काराच्या ऑपरेशन सिंदूरने भारतीयांची मने जिंकली. त्यात मोदी सरकारची कुटनीती, धोरणाचे कौतुक झाले. तर युद्ध विरामावर पण काहींनी तोंडसुख घेतले. एकूणच या सर्व घडामोडींवर सध्या काँग्रेसमध्ये सुद्धा मतमतांतरे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचे कौतुक केले आहे. अनेक मंचावर त्यांचे हे प्रेम उफाळून आलेले दिसले. तर दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी सुद्धा हीच भूमिका घेतली. त्यांच्या एका वक्तव्याने काँग्रेसमध्ये भूकंपाची स्थिती आली आहे.
चिंदबरम यांनी नुकताच एका इंग्रजी दैनिकात लेख लिहिला. त्यात ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकिस्तानमधील युद्ध विरामावर थेट भाष्य केले आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या फैसल्यांचे कौतुक केले आहे. त्यातच त्यांच्या एका विधानाने मोठी आग लागली आहे. त्यांनी INDIA आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्न उभा केला. त्यामुळे येत्या काळात दक्षिण राज्यातील राजकारणाने मोठी कूस बदलली तर नवल वाटायला नको.
INDIA आघाडीवर मोठे प्रश्नचिन्ह




चिदंबरम यांनी गुरूवारी इंडिया आघाडीच्या अस्तित्वावर सवाल उठवला. ही आघाडी सध्या अस्तित्वात आहे का, असा घणाघात त्यांनी केला. त्यांनी ही टिप्पणी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमधील एका कार्यक्रमात केला. Contesting Democratic Deficit या पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी त्यांनी आघाडीवर सडेतोड मत मांडले. या पुस्तकाच्या अनुषंगाने, इंडिया आघाडी अस्तित्वात आहे, या मताशी आपण सहमत नसल्याचे ते म्हणाले. खरं तर सलमान खुर्शीद त्याचे उत्तर देऊ शकतील, ते या आघाडीशी चर्चा करणाऱ्या टीमचे सदस्य आहेत, असे चिदंबरम म्हणाले. जर इंडिया आघाडी कायम आहे, तर मला आनंद आहे. पण ही आघाडी मजबूत आहे, असे मला वाटत नाही. अर्थात ही आघाडी अजून जोडल्या जाऊ शकते, अजून वेळ आहे. अजून बऱ्याच घटना घडतील, असे चिदंबरम म्हणाले.
भाजपा सारखा राजकीय पक्ष इतिहासात नाही
कोणतीही आघाडी ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात येत नाही, असे ते म्हणाले. तर त्याचवेळी त्यांनी भारतीय जनता पार्टी सारखा संघटित राजकीय पक्ष देशाच्या इतिहासात नसल्याची पुस्ती जोडली. हा केवळ एक पक्ष नाही तर एक मशीन आहे. या मशीन मागे सुद्धा एक मशीन असल्याचे ते म्हणाले. या दोन्ही संस्था देशातील अनेक संस्थावर नियंत्र ठेवतात. निवडणूक आयोगापासून ते पोलीस ठाण्यापर्यंत त्यांचे नियंत्रण आहे, अशी टीका सुद्धा त्यांनी भाजपावर केली. हा एकपक्षीय शासन व्यवस्थेसारखा काम करत असल्याचा धोका सुद्धा त्यांनी व्यक्त केला.