PHOTO | पाहा इथे बनतोय देशातला पहिला ‘केबल रेल ब्रिज’, जाणून घ्या याची वैशिष्ट्ये!

भारतीय रेल्वेचा पहिला केबल ब्रिज जम्मू-काश्मीरमधील ऊधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक विभागात उभारला जात आहे.

1/6
भारतीय रेल्वेचा पहिला केबल ब्रिज जम्मू-काश्मीरमधील ऊधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक विभागात उभारला जात आहे. ‘अंजी ब्रिज’ असे या पुलाचे नाव असून, याची लांबी 473.25 मीटर आहे.

2/6
अंजी पुलाच्या खांबाची उंची नदीच्या तळापासून 331 मीटर आहे.

3/6
हा पुल जम्मू-काश्मीरमधील कटरा आणि रियासीला यांना जोडणार आहे. ऊधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला दरम्यानचा हा रेल लिंक 292 किमी लांबीचा आहे.

4/6
या पुलाला भक्कम आधार देण्यासाठी 96 केबल्सचे जाळे तयार केले जाणार आहे. हे विशेष डिझाईन तीव्र वाऱ्याच्या माऱ्यात आणि तीव्र वादळातही पुलाला भक्कमपाने उभे राहण्यास मदत करेल.

5/6
हा पूल ऊधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला यांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाचा एक भाग आहे. या पुलाच्या माध्यमातून कटारा ते श्रीनगरपर्यंत थेट रेल्वे गाड्या चालवण्यात येतील.

6/6
अंजी पूल हा पूर्णपणे केबलच्या जाळ्यावर टिकून राहणार आहे. हा पूल कुतुब मीनारपेक्षा सुमारे 4 पट उंच आहे. रेल्वे मंत्रालयाने ट्विटरद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI