AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुकाने उघडी, दारांना कुलूप नाही, तरीही होत नाही चोरी… या अनोख्या गावाची संपूर्ण भारतात होतेय चर्चा

Honest Village of India: भारतात असे एक गाव आहे जे आपल्या इमानदारीसाठी ओळखले जाते. या गावात अनेक दुकाने आहेत, मात्र त्यात सामान देण्यासाठी तिथे दुकानदार नसतो, तसेच या गावातील दुकानांना कुलूपही नसते.

दुकाने उघडी, दारांना कुलूप नाही, तरीही होत नाही चोरी... या अनोख्या गावाची संपूर्ण भारतात होतेय चर्चा
Honest Village of India
| Updated on: Oct 23, 2025 | 6:25 PM
Share

बातम्यांमध्ये तुम्ही दररोज चोरी, फसवणूक, पैसे लुबाडण्याच्या घटना घडत असतात. मात्र भारतात असे एक गाव आहे जे आपल्या इमानदारीसाठी ओळखले जाते. नागालँडमधील खोनोमा हे गाव खूप खास आहे. या गावात अनेक दुकाने आहेत, मात्र त्यात सामान देण्यासाठी तिथे दुकानदार नसतो, तसेच या गावातील दुकानांना कुलूपही नसते. याचाच अर्थ ही दुकाने 24 तास उघडी असतात. इथे लोक सामान खरेदी करतात आणि पैसे ठेवून जातात. या गावात कधीही चोरी होत नाही. या गावाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दुकानं असतात उघडी

नागालँडमधील खोनोमा गावातील दुकानांना कुलूप लावले जात नाही. इथे कधीही फसवणूक किंवा चोरी होत नाही, त्यामुळे हे गाव प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हतेसाठी ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून दुकानदार नसलेली दुकाने आहेत. ग्राहक स्वतःचे सामान घेतात आणि योग्य रक्कम तिथे सोडून निघून जातात. या ठिकाणी कधीही चोरीचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे या गावाचा उल्लेख प्रामाणिकपणाचे प्रतीक म्हणून केला जाते.

भारतातील पहिले ग्रीन व्हिलेज

खोनोमा हे गाव प्रामाणिकपणा, सौंदर्य आणि स्वच्छ वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. येथील लोकांना कोणतीही भीती नसते. येथील दुकानांमध्ये वस्तू आणि इतर ग्राहकांना सोडलेले पैसे असतात. हे पैसे आणि सामान सुरक्षित असते. येथील गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की, इतरांची फसवणूक करणे हे चुकीचे आहे. त्यामुळे कोणीही चोरी करत नाही. त्यामुळे संपूर्ण देशात या गावाची चर्चा होत आहे. तसेच खोनोमा हे भारतातील पहिले हिरवे गाव म्हणूनही ओळखले जाते. या गावातील लोक पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. या गावाला भेट देण्यासाठी भारतासह परदेशातूनही पर्यटक येत असतात.

या गावाला कसे पोहोचायचे?

खोनोमा गाव हे अनोखे गाव नागालँडची राजधानी कोहिमापासून अंदाजे 20 किलोमीटर अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दिमापूरला पोहोचावे लागेल. यासाठी तुम्ही विमान किंवा रेल्वे प्रवास करू शकता. त्यानंतर दिमापूरवरून कोहिमाला टॅक्सी किंवा बसने 3 तासांच्या प्रवासानंतर पोहोचू शकता. त्यानंतर तुम्हाला टॅक्सी किंवा शेअर्ड जीपने खोनोमा गावात सहज जाता येईल. त्यानंतर या ठिकाणचे सौंदर्य आणि येथील दुकाने पाहू शकतो.

Follow Us
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या...

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या..