AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitish Kumar : मोदींना रोखण्यासाठी इंडिया आघाडीचा मोठा गेम उघड; नितीश कुमार यांना दिली पंतप्रधान पदाची ऑफर

Nitish Kumar on Congress : बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे (संयुक्त) प्रमुख नितीश कुमार यांच्याकडून काँग्रेसला अजूनही मोठी आशा आहेत. नितीश कुमार कोलांट उडी घेऊन टुणकन इंडिया आघाडीत येतील आणि केंद्रात सत्ता स्थापन करता येईल असे त्यांना वाटत आहे. पडद्यामागे घडामोड काय?

Nitish Kumar : मोदींना रोखण्यासाठी इंडिया आघाडीचा मोठा गेम उघड; नितीश कुमार यांना दिली पंतप्रधान पदाची ऑफर
काँग्रेसला जेडीयूचा करार जवाब
| Updated on: Jun 08, 2024 | 2:31 PM
Share

देशात लोकसभेचा निकाल आल्यापासून इंडिया आघाडीला पण सत्ता स्थापनेचे स्वप्न पडत आहे. त्यासाठी दम लगा के हईशा सुरु आहे. हाकारे पिटल्या जात आहेत. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना खलिते पाठविण्यात आले आहे. दूतांमार्फत सांगावा धाडण्यात आला आहे. उद्या एनडीएचा शपथविधी सोहळा होण्यापूर्वी तरी काही चमत्कार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण इंडिया आघाडीच्या आशा टवटवीत आहेत. मोदींना रोखण्यासाठी इंडिया आघाडीने  नितीश कुमार यांना पंतप्रधाना पदाची ऑफर दिली आहे. त्यावर जनता दलाकडून (संयुक्त) त्यांना असं सणसणीत उत्तर मिळालं आहे.

इंडिया आघाडीला नितीशबाबूंचा टेकू

इंडिया आघाडीला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागतील. त्यांच्या आशा मजबूत आहे. उद्या एनडीएची शपथविधीची तयारी जोरदार आहे. इंडिया आघाडीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा टेकू हवा आहे. चंद्राबाबू नायडू आले तर मग चार चांद लागतील. पण या सर्व कवायतींना काही केल्या यश काही येईना, त्यातच जेडीयूने असा करार जवाब दिला आहे की मुद्यातील हवाच निघून गेली आहे.

जेडीयूने दिले सणसणीत उत्तर

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने जोरदार प्रदर्शन केले. दिग्गज विश्लेषकांना पाणी पाजले. एनडीए 400 पारच्या नाऱ्यातील हवाच काढली. इंडिया आघाडीने नाही नाही म्हणता मोठी मजल मारली. आता सत्ता स्थापण्यासाठी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी इंडिया आघाडी चाचपणी करत आहे. त्यांना गेल्यावर्षीचा त्यांच्या मित्राची नितीश कुमार यांची आठवण न येईल तर नवलच. त्यांनी या मित्राला गळ घालून पाहिला. इंडिया आघाडीचे संयोजक पद देण्यासाठी काँग्रेसने कुरकुर केली आणि आता नितीश कुमार यांना पंतप्रधान पद द्यायला निघालेत, असे सणसणीत उत्तर जेडीयुचे ज्येष्ठ नेते केसी त्यागी यांनी दिले.

आकड्यांचा खेळ असा

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला 240 आणि एनडीएला 293 जागा आहेत. त्यात नितीश कुमार यांच्या जनता दलाला (संयुक्त) 12 तर तेलगू देसम पक्षाला 16 जागा आहेत. नितीश कुमार यांना इंडिया आघाडीने पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याचे समजते. पण केसी त्यागी यांनी ही ऑफर धुडकावली आहे. त्यांनी काँग्रेसला इंडिया आघाडीच्या स्थापनेवेळीची आठवण करुन दिली आहे. नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची मोट बांधली होती. पण नंतर त्यांनाच बाजूला करण्यात आल्याने नितीश कुमार यांनी पुन्हा मोदींकडे धाव घेतली.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा