AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांना राज्यसभेसाठी नामांकन, पीएम मोदींची घोषणा

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि प्रसिद्ध लेखिका पद्मश्री सुधा मूर्ती यांची राज्यसभेसाठी निवड जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर ही माहीती पोस्ट केली आहे. सुधा मूर्ती यांचे सामाजिक कार्य, सामाजिक बांधीलकी आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रातील योगदान अतुलनीय आणि प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांना राज्यसभेसाठी नामांकन, पीएम मोदींची घोषणा
SUDHA MURTI
| Updated on: Mar 08, 2024 | 2:20 PM
Share

नवी दिली | 8 मार्च 2024 : जगप्रसिध्द आयटी कंपनी इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी प्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्ष सुधा मुर्ती यांचे राज्यसभेसाठी नामांकन केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान यांनी ही घोषणा केली आहे. आपल्या एक्स ( आधीचे ट्वीटर ) अकाऊंटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहीती दिली आहे. साल 2006 मध्ये सुधा मूर्ती यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी सरकारने पद्मश्री  पुरस्कार प्रदान केला होता.

येथे पहा ट्वीट –

सुधा मुर्ती या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा असून त्या टाटा कंपनीत रुजू होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला इंजिनिअर आहेत. त्यांचा विवाह इंजिनिअर नारायण मूर्ती यांच्याशी झाला. त्यानंतर नारायण मूर्ती यांनी इन्फोसिस कंपनीची भारतात स्थापना केली आणि आज यशस्वी उलाढाल करणारी जगातील एक प्रख्यात आयटी कंपनी आहे. इन्फोसिसच्या निर्मितीत सुधा मूर्ती यांचाही मोठा सहभाग आहे. सुधा मूर्ती यांचे दागिने घेऊन त्यातून नारायण मूर्ती यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने इन्फोसिसची मुहूर्तमेढ रोवली होती. सुधा मूर्ती या शिक्षिक आणि लेखिका देखील आहेत. त्यांची अनेक पुस्तके बेस्ट सेलर आहेत. आपल्या साध्या आणि पारंपारिक मुल्ये जतन करणाऱ्या स्वभावामुळे त्या प्रसिद्ध आहेत. 2006 मध्ये मूर्ती यांना भारत सरकारने त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री या भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. सुधा मुर्ती यांची कन्या अक्षता हिच्याशी लंडनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांचा विवाह झाल्याने ते सुधा मूर्ती यांचे जावई आहेत.

कोण आहेत सूधा मूर्ती

सामाजिक कार्य, सामाजिक बांधीलकी आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुधाजींचे योगदान अतुलनीय आणि प्रेरणादायी आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. सुधा मूर्ती यांचा जन्म कर्नाटकातील देशस्थ माधव ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांची संस्कृती आणि परंपरेशी नाळ घट्टपणे जुळलेली आहे. कन्नड आणि इंग्रजी या दोन्ही भाषांवर त्यांचे चांगले प्रभुत्व आहे. समाजसेवा आणि साहित्यात त्यांनी आपल्या योगदानाने मोठे काम केले आहे. त्यांची ‘डॉलर बहू’ ही कादंबरी त्यांनी मुळात कन्नडमध्ये लिहिली गेली होती आणि त्यानंतर इंग्रजीमध्ये त्यांनी अनुवादित केली, त्यांची कन्या अक्षता हीचा लंडनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी विवाह झाला आहे.सुधा मूर्ती यांची दीडशेहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी लैंगिक भेदभाव आणि स्टिरियो टाइपच्या विरोधात लिहिले आहे. त्यांची एकूण संपत्ती 775 कोटी असल्याचे म्हटले जाते. तरीही त्या अत्यंत साधेपणाने जीवन जगतात. सुधा मूर्ती सांगतात की, गेल्या तीस वर्षांत त्यांनी एकही नवीन साडी घेतलेली नाही. त्यांना शाकाहार खूपच पसंत आहे. परदेशात जाताना त्या शाकाहारी जेवण सोबतच घेऊन जातात.

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.