पाकिस्तानला गुडघ्यांवर आणायची धमक कोणात? पीएम मोदी, राहुल गांधी, अखिलेश यादव की ओवैसी? सर्व्हेत मोठा खुलासा
Operation Sindoor Survey: पीएम मोदी, राहुल गांधी, अखिलेश यादव की ओवैसी? पकिस्तान विरोधी कारवाई करण्याची आणि शत्रूराष्ट्राला गुडघ्यांवर आणायची धमक कोणात्या नेत्यामध्ये? सर्व्हेत मोठा खुलासा

Operation Sindoor Survey: 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत बदला घेतला आणि पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. पाकिस्तान विरोधात केलेल्या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सशक्त नेते म्हणून जगासमोर आले आहेत. एवढंच नाही तर, नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि ममता बनर्जी यांना देखील मागे टाकलं आहे. नुकताच झालेल्या एका सर्व्हेमध्ये मोठी गोष्ट समोर आली आहे. हा सर्व्हे आईएएनएस मॅटरायज यांनी केलाय.
9 मे ते 15 मे 2025 दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात, लोकांना विचारण्यात आले की ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या कारवाईत देशाचा कोणता नेता पाकिस्तानला धडा शिकवण्यास सर्वात जास्त सक्षम आहे? यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक पाठिंबा मिळाला. 70 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की नरेंद्र मोदी पाकिस्तानला धडा शिकवण्यास सर्वात सक्षम आहेत. यानंतर राहुल गांधी यांना लोकांनी निवडलं, त्यांना फक्त 5 टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला आहे.
राहुल गांधी यांच्यानंतर लोकांनी असदुद्दीन ओवैसी यांची सक्षम नेता म्हणून निवड केली आहे. ज्यांना 4 टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला आहे, तर सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांना 3 टक्के, आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना 2 टक्के, तृणमूल काँग्रेसचे प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 2 टक्के




डीएमकेचे प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांना 1 टक्के, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना 1 टक्के, राजद नेते तेजस्वी यादव यांना 1 टक्के, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना 1 टक्के, बिजू जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन पटनायक यांना 1 टक्के, इतरांनी 1 टक्के आणि ‘माहित नाही किंवा सांगू शकत नाही’ यावर 8 टक्के लोकांनी मत नोंदवलं आहे.
ऑपरेशन सिंदूरमुळे पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली का?
सर्वेक्षणानुसार, 69 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की या ऑपरेशनमुळे पंतप्रधान मोदींची जागतिक प्रतिमा आणखी मजबूत झाली आहे, तर 26 टक्के लोक म्हणतात की त्यांच्या प्रतिमेत कोणताही बदल झालेला नाही आणि 5 टक्के लोकं त्याबद्दल अनिश्चित आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे असं 74 टक्के लोकांना वाटतं.
एवढंच नाही तर, सर्व्हेनुसार, 92 टक्के लोकांनी मान्य केलं आहे की, सध्या मोदी सरकारच दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्यास सक्षम आहे. तर 1 टक्के लोकांच्या मते मोदी काही प्रमाणात सक्षम आहे. 4 टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिलं आणि 3 टक्के लोक ‘माहित नाही किंवा सांगू शकत नाही’ असं उत्तर दिलं आहे.