AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपालांमुळे राष्ट्राला, संविधानाला धोका, राष्ट्रपतींनी चौकशी करावी; बच्चू कडू यांचं गंभीर विधान

राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या मुद्दा अजूनही अधांतरी असतानाच शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी गंभीर विधान केलं आहे. राज्यपाल नियबाह्य काम करतात. (president kovind should inquiry raj bhavan, says bacchu kadu)

राज्यपालांमुळे राष्ट्राला, संविधानाला धोका, राष्ट्रपतींनी चौकशी करावी; बच्चू कडू यांचं गंभीर विधान
बच्चू कडू, राज्यमंत्री
Reporter Rahul Zori
Reporter Rahul Zori | Edited By: | Updated on: Sep 01, 2021 | 3:35 PM
Share

नवी दिल्ली: राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या मुद्दा अजूनही अधांतरी असतानाच शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी गंभीर विधान केलं आहे. राज्यपाल नियबाह्य काम करतात. राज्यपालांमुळे राष्ट्राला आणि संविधानाला धोका आहे. राष्ट्रपतींनी याबाबतची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. (president kovind should inquiry raj bhavan, says bacchu kadu)

बच्चू कडू दिल्लीत आले आहेत. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं. राज्यपाल नियमबाह्य काम करतात. त्यात राष्ट्रपतींनी लक्ष घालायला हवं. राष्ट्रपतींनी आता राजभवनाची चौकशी करायला हवी. राज्यपालांमुळे राष्ट्राला, संविधानाला धोका निर्माण झाला आहे, असा गंभीर आरोप कडू यांनी केला.

फडणवीसांना टोला

यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना हे बोलावच लागेल. मी विरोधी पक्षनेता आहे हे सांगावच लागतं, असा टोला त्यांनी लगावला.

मंदिरे उघडावीत मलाही वाटतं

मंदिरे उघडण्याचा मुद्द्यावरूनही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मंदिर आणि शाळा उद्यापासून उघडाव्यात असं मलाही वाटतं. पण मंदिरं जाणीवपूर्वक बंद ठेवलेले नाहीत. आर्थिक कोंडी होतेय हे मान्य आहे. पण कोरोनाला थांबवण्यासाठी हे गरजेचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

आघाडीकडून ‘या’ नावांची शिफारस

महाविकास आघाडीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने 6 नोव्हेंबर 2020 रोजी 12 नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली होती. त्यात राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांच्या नावाचा तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसैन आणि अनिरूद्ध वनकर आणि शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानुगडे पाटील यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.

राज्यपालांचं सरकारला चर्चेचं निमंत्रण?

विधानपरिषदेतील 12 नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीबाबतचा वाद मुंबई हायकोर्टाने काही दिवसांपूर्वी निकाली काढला. “या जागा दीर्घकाळ रिकाम्या राहू शकत नाहीत. राज्यपालांच्या अधिकारांच्याबाबतीत आम्ही काही गोष्टी विचारात घेतल्या आहेत. जर काही गोष्टी विशिष्ट कारणांसाठी होत असतील तर त्याची कारणीमिमांसा होणं गरजेचं आहे”, असं हायकोर्टाने नमूद केलं. सुव्यवस्थेसाठी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात समन्वय असायला हवा. अशाप्रकारे नामनिर्देशित जागा अनिश्चित काळासाठी रिकाम्या ठेवता येणार नाहीत. राज्यपालांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला हवं. ते कधीपर्यंत द्यावं हे त्या परिस्थितीवर अवलंबून आहे, असंही यावेळी हायकोर्टाने म्हटलं. (president kovind should inquiry raj bhavan, says bacchu kadu)

संबंधित बातम्या:

12 आमदारांचा वाद : हायकोर्ट म्हणतं, राज्यपाल बांधिल नाहीत पण निर्णय लवकर घ्यावा, होणार का निर्णय?

‘पत्र गेलेलं आहे, वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल’, 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन शरद पवारांचा राज्यपालांना टोला

अखेर मुहूर्त ठरला; महाविकास आघाडीचे नेते 1 सप्टेंबरला राज्यपालांना भेटणार, 12 आमदार नियुक्तीचा तिढा सुटणार?

(president kovind should inquiry raj bhavan, says bacchu kadu)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...