AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manipur Viral Video : देशातील ‘बेस्ट पोलीस स्टेशन’ अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर; तरीही महिलांची नग्न धिंड निघाली

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलीस स्टेशनला पुरस्कार दिला जातो. महिलांवरील गुन्हे आणि दुर्बळ घटकांवरील अत्याचाराची माहिती घेऊनच पोलीस स्टेशनला पुरस्कार दिला जात असतो.

Manipur Viral Video : देशातील 'बेस्ट पोलीस स्टेशन' अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर; तरीही महिलांची नग्न धिंड निघाली
manipur viral videoImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 22, 2023 | 9:10 AM
Share

इंफाळ | 22 जुलै 2023 : मणिपूर येथे दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने देशभरात संतापाची लाट पसरली आहे. लोकांमध्ये चीड निर्माण झाली असून संतप्त प्रतिक्रियाही उमटत आहेत. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतल्यानंतर सत्ताधारी आणि पोलिसांना जाग आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी सुरू झाली आहे. पोलिसांनी या चौघांना अटक केली असली तरी ही घटना घडली तेव्हा पोलीस काय करत होते? असा सवाल केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडली तिथून देशातील सर्वात बेस्ट पोलीस स्टेशन अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

कुकी समुदायातील दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जमावाने या महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. यातील एक महिला कारगिल युद्धातील सैनिकाची पत्नी आहे. त्यामुळे या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. लोक संतापले आहेत. चीड व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावरून आपला राग व्यक्त करत आहेत. तर अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत. संसद आणि राज्याराज्यांच्या विधानसभेतही या घटनेचे पडसाद उमटले आहेत.

दोन महिन्यानंतर घटना उजेडात

एका वृत्तवाहिनीच्या दाव्यानुसार, ही घटना जिथे घडली. तिथून एक किलोमीटरच्या अंतरावरच देशातील सर्वोत्तम पोलीस स्टेशन आहे. तरीही पोलिसांना ही घटना टाळता आली नाही. विशेष म्हणजे सर्वोत्तम पोलीस स्टेशनला दोन महिने उलटले तरी या घटनेची गंधवार्ता नव्हती. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाने झापल्यानंतरच या पोलीस स्टेशनला ही घटना कळावी याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नोंगपोक सेकमाई असं या देशातील सर्वोत्तम पोलीस स्टेशनचं नाव आहे. संबंधित वृत्तवाहिनीने त्यांच्या सॅटेलाईट इमेजद्वारे पोलीस स्टेशन आणि घटनेतील अंतराचं विश्लेषण केल्यानंतर ही धक्कादायक बाब उजेडात आली आहे. या वृत्त वाहिनीने गुगल अर्थच्या माध्यमातूनही या घटनेचं विश्लेषण केलं आहे.

तीन वर्षापूर्वी मिळाला पुरस्कार

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलीस स्टेशनला पुरस्कार दिला जातो. महिलांवरील गुन्हे आणि दुर्बळ घटकांवरील अत्याचाराची माहिती घेऊनच पोलीस स्टेशनला पुरस्कार दिला जात असतो. या निष्कर्षात नोंगपोक सेकमाई पोलीस स्टेशन हे 2020मध्ये सर्वोत्तम ठरले. त्यामुळे या पोलीस स्टेशनला देशातील सर्वोत्तम पोलीस स्टेसनचा पुरस्कारही देण्यात आला होता. मात्र, आता या पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच देश आणि जग हादरवून सोडणारी घटना घडल्याने या पोलीस स्टेशनच्या कारभारावरच प्रश्नचिन्हं उपस्थित झाले आहेत.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.