श्रावणात थाळीत हड्डी आली… तरीही पोट फुटेस्तोवर जेवले, बिल देण्याची वेळ येताच… सीसीटीव्हीत असं काय दिसलं?
सध्या श्रावण सुरू असल्याने अनेकांनी नॉनव्हेज खाणे बंद केलंय. मात्र, चक्क हॉटेलमध्ये व्हेज थाळीत बिर्याणीमधील हाडं सापडल्याने मोठी खळबळ उडालीये. या घटनेनंतर थेट पोलिस घटनास्थळी पोहोचले. या घटनेचा सीसीटीव्ही आता व्हायरल होतोय.

सध्या संपूर्ण देशभरात श्रावण महिन्याचा उत्साह बघायला मिळतोय. अनेकजण या महिन्यात नॉनव्हेज खाणे बंद करतात. मात्र, एका हॉटेलमध्ये जेवण्यास गेलेल्यांच्या व्हेज जेवणात चक्क हाडे सापडल्याची धक्कादायक घटना घडली. ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. बिर्याणी बे रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला. व्हेज खाण्यात बिर्याणीतील हाड निघाल्याचे सांगून यावेळी ग्राहक मोठा गोंधळ घालत होते. मात्र, त्यानंतर हॉटेलच्या मालकाने चक्क पोलिसांना बोलावले आणि पुढे जे घडले ते अत्यंत हैराण करणारे होते.
बिर्याणी बे रेस्टॉरंटमध्ये व्हेज बिर्याणीमध्ये हाडे टाकल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधी याच रेस्टॉरंटचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये व्हेज बिर्याणीमध्ये हाडे सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. आता हॉटेलच्या मालकाने ग्राहकांना चक्क रंगेहात पकडल्याचे बघायला मिळतंय. त्यानंतर थेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गुरुवारी रात्री 31 जुलै रोजी 12 ते 13 लोक रेस्टॉरंटमध्ये जेवायला आले. त्यापैकी काहींनी व्हेज ऑर्डर केले तर काहींनी नॉनव्हेज ऑर्डर केले.
दरम्यान, एका तरुणाने व्हेज थाळीमध्ये हाडे असल्याचा आरोप करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. व्हेज जेवणात हाडे आढळली असून तुम्ही आमचा धर्म भ्रष्ट केल्याचा आरोप त्यांनी केला. यानंतर काही वेळ गोंधळाचे वातावरण बघायला मिळाले. 12 ते 13 लोक रेस्टॉरंटमध्ये गोंधळ घालत असताना हॉटेलच्या मालकाने थेट पोलिसांनी फोन केला. त्यांचे म्हणणे होते की, आम्ही व्हेज आणि नॉनव्हेज सर्व वेगवेगळे मागवले होते मग व्हेजमध्ये हाडं कसे मिळाले. पोलिस आल्यानंतर त्यांनी हॉटेलचे सीसीटीव्ही चेक केले.
यानंतर स्पष्ट दिसत होते की, एकजण नॉनव्हेजमधील हाडं व्हेज जेवणात टाकत आहे. बिल जास्त भरायचे नसल्यामुळेच यांनी असे केल्याचे सांगितले जातंय. मात्र, सीसीटीव्हीमुळे यांचे नाटक फसले. पोलिसांनी धक्के मारत या युवकांना बाहेर काढले. मात्र, हा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. ज्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या मुलांवर काही कारवाई करण्यात आले की, नाही याबद्दल माहिती कळू शकली नाहीये.
