AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परीक्षा न देताच आयएएस?; लोकसभा अध्यक्षांच्या मुलीने दिले ‘हे’ उत्तर

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची कन्या अंजली बिर्ला यांची यूपीएससीसाठी निवड झाली आहे. (Speaker Om Birla's Daughter Reply To Trolls On IAS Backdoor Entry)

परीक्षा न देताच आयएएस?; लोकसभा अध्यक्षांच्या मुलीने दिले 'हे' उत्तर
| Updated on: Jan 21, 2021 | 7:57 PM
Share

नवी दिल्ली: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची कन्या अंजली बिर्ला यांची यूपीएससीसाठी निवड झाली आहे. यूपीएससीची परीक्षा न देताच अंजली यांना आयएएस करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलच गाजत आहे. मात्र, अंजली यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच या प्रकरणावरून ट्रोल करणाऱ्यांनाही त्यांनी चांगलेच फैलावर घेतलं आहे. (Speaker Om Birla’s Daughter Reply To Trolls On IAS Backdoor Entry)

अंजली बिर्ला यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून ट्रोलिंग सुरू असल्याने या ट्रोलिंगविरोधातही कायदा असावा, अशी मागणी अंजली यांनी केली आहे. अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना शोधलं पाहिजे आणि त्यांना या प्रकरणी जबाबदार धरून शिक्षा केली पाहिजे. आज या प्रकरणात मी बळी ठरले, उद्या आणखी कोणी तरी बळी ठरेल, असंही त्या म्हणाल्या.

काय आहे आरोप

अंजली यांनी पहिल्याच प्रयत्नात तीन टेस्ट परीक्षांमध्ये यश मिळवलं आहे. यूपीएससीने 2019 साठी जारी केलेल्या गुणवत्ता यादीत त्यांचं नाव आहे. मात्र, अंजली या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचा फायदा मिळाला असून मागच्या दाराने यूपीएससीसाठी त्यांची निवड करण्यात आल्याचा आरोप सोशल मीडियातून होत आहे.

अंजली काय म्हणतात?

यूपीएससीचा एवढा अभ्यास करून परीक्षा दिल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल, याचं मला आश्चर्य वाटतं. पण या प्रकरणाने मला आणखीनच कणखर बनवलं आहे. पुढे भविष्यातही मला अशाच प्रकारांना सामोरे जावं लागेल याचा धडा मला याप्रकारातून मिळाला आहे. या प्रकरणामुळे एक व्यक्ती म्हणून मला अधिकच परिपक्व केलं आहे, असंही त्या म्हणाल्या.

मी माझ्याशी नेहमीच प्रामाणिक राहिले आहे. माझ्या जवळच्यांना आणि आप्तेष्टांना मी किती मेहनत घेतलीय हे माहीत आहे, असंही त्या म्हणाल्या. संपूर्ण वर्षभरात यूपीएससीची परीक्षा तीन टप्प्यात होते. तुम्ही या तिन्ही परीक्षांमध्ये पास झाला तरच सनदी अधिकारी बनता. यूपीएससी सीएसईची परीक्षा अत्यंत पारदर्शीपणे होते. तिथे मागच्या दाराने प्रवेशाचा प्रश्नच नसतो. किमान या संस्थेचा तरी आदर राखा, असं आवाहन त्यांनी ट्विटमधून केलं आहे. एवढंच नव्हे तर अंजली यांनी त्यांच्या तिन्ही परीक्षेची कागदपत्रेही सार्वजनिक केली आहेत. (Speaker Om Birla’s Daughter Reply To Trolls On IAS Backdoor Entry)

रोज 12 तास अभ्यास

वर्षभरापासून मी या परीक्षेची तयारी करत आहे. मी दिवसाला 12 तास अभ्यास करत होते. त्यामुळेच मी या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले. या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सातत्य महत्त्वाचे आहे, असंही त्या म्हणाल्या. अंजली यांच्या मोठ्या बहिणीने चार्टड अकाऊंटची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. माझी बहीणच माझा मुख्य आधार आहे. तिनेच मला आयएएसच्या परीक्षेसाठी तयार केलं, असंही त्यांनी सांगितलं. (Speaker Om Birla’s Daughter Reply To Trolls On IAS Backdoor Entry)

संबंधित बातम्या: 

ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का; सहकाऱ्याकडून नव्या पक्षाची स्थापना

अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी गौतम गंभीरकडून 1 कोटी रुपयांचा निधी

घरात पेटवलेली शेकोटी ठरली शेवटची, आई-वडिलांसह कुशीतच चिमुकल्याचाही मृत्यू

(Speaker Om Birla’s Daughter Reply To Trolls On IAS Backdoor Entry)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...