भारताच्या या ट्रेनची लांबी इतकी मोठी की, या टोकापासून त्या टोकापर्यंत जाण्यास लागतो एक तास लागतो
या भल्यामोठ्या लांबीच्या ट्रेनला ओढण्यासाठी देखील मोठी ताकद लागते. त्यामुळे या भल्यामोठ्या ट्रेनला सहा इंजिनांच्या मदतीने ओढले जाते. या ट्रेनला एका स्थानकातून पार होण्यासाठी चार मिनिटांचा वेळ लागतो.

भारतीय रेल्वेने दररोज अडीच कोटी प्रवासी प्रवास करतात, वेगवेगळ्या कॅटगरीच्या ट्रेनमुळे भारतीय रेल्वेला देशातील सर्वात मोठा ट्रान्सपोटर म्हटले जाते. भारतीय रेल्वेचे नेटवर्क जगात चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. या भारतीय रेल्वेच्या सर्वात मोठ्या ट्रेन संदर्भात तुम्हाला एक महत्वाची गोष्ट माहीती आहे का ? भारतीय रेल्वेच्या सर्वात लांब ट्रेनची लांबी इतकी मोठी आहे की या ट्रेनला 6 इंजिन्स आहेत आणि या ट्रेनला तब्बल 295 डबे आहेत. देशाच्या या सर्वात लांब ट्रेनच्या लांबी 3.5 किमी आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात लांब ट्रेन ( super vasuki ) बद्दल सविस्तर सांगणार आहोत. ही ट्रेन देशातील सर्वात लांब ट्रेन म्हणून ओळखली जाते.
‘सुपर वासुकी’ ही देशाची सर्वात लांब ट्रेन
सुपर वासुकी ही देशातील सर्वात लांबीची ट्रेन आहे आणि ती देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी सुरू झाली होती. लांबपल्ल्याच्या सर्वसाधारण मेल एक्स्प्रेस प्रमाणे या ट्रेनला 20 किंवा 30 डबे नव्हे तर एकूण तब्बल 295 डबे जोडलेले असतात. ही ट्रेन या सर्व डब्यांना सोबत घेऊन धावते. या भल्यामोठ्या लांबीच्या ट्रेनला ओढण्यासाठी देखील मोठी ताकद लागते. त्यामुळे या भल्यामोठ्या ट्रेनाल सहा इंजिनांच्या मदतीने ओढले जाते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ट्रेनची लांबी अंदाजे 3.5 किलोमीटर इतकी आहे. या ट्रेनच्या जर तुम्ही एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत गेला तर या प्रवासाला आपल्याला तासभरही लागू शकतो.
‘सुपर वासुकी’ ही सामान्य प्रवासी ट्रेन नाही
‘सुपर वासुकी’ ही भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी सर्वात लांब मालगाडी आहे. ही ट्रेन छत्तीसगडमधल्या कोरबा येथून नागपूरातील राजनांदगावपर्यंत धावते. हे अंतर कापण्यासाठी या मालगाडीला एकूण 11 तास 20 मिनिटे लागतात. एखाद्या स्थानकांवरून ही मालगाडी धावते तेव्हा या मालगाडीला प्रवास करताना एक स्थानक पार करण्यासाठी साडेचार मिनिटांचा काळ लागतो.
वासुकी सामान्य मालगाडीपेक्षा तिप्पट मजबूत
‘सुपर वासुकी’या मालगाडीला तयार करण्यासाठी भारतीयरेल्वेने पाच मालगाड्यांचे डबे एकत्र जोडले आहेत.या ट्रेनने वाहून नेलेला एकूण कोळसा दिवसभर 3000 मेगावॅटच्या पॉवर प्लांटला पेटवण्यासाठी पुरेसा आहे.माल वाहण्याची या ट्रेनची क्षमता सामान्य मालगाड्यांच्या क्षमतेपेक्षा तिप्पट आहे. ‘सुपर वासुकी’ ट्रेन एका फेरीत सुमारे 9,000 टन कोळसा वाहून नेत असते.
जगातील सर्वात मोठी ट्रेन या देशात
भारतीय रेल्वेने यापूर्वी ‘ॲनाकोंडा’ आणि ‘शेषनाग’ सारख्या ट्रेन चालवल्या आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की जगातील सर्वात लांब ट्रेन कोणती होती? ऑस्ट्रेलियन BHP आयर्न ही जगातील सर्वात जास्त लांबीची ट्रेन आहे. ही ट्रेन भारतीय रेल्वेच्या ‘सुपर वासुरी’ मालगाडीपेक्षाही दुप्पट लांबीची ट्रेन आहे. ऑस्ट्रेलियाची ही ट्रेन जगातील सर्वात लांब ट्रेन आहे. ही ट्रेन 2001 मध्ये सुरू झाली आणि ती 7.353 किमी लांबीची आहे. जगातील ही सर्वात लांब ट्रेन आहे.
