AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Hanuman jayanti violence : मिरवणुकीत मोठ्या आवाजात संगीत, घोषणाबाजी आणि नमाजची वेळ… असं काय घडलं?

Delhi Hanuman jayanti violence : देशाच्या काणोकोपऱ्यात हनुमान जयंती जोरदार करण्यात येत असतानाच याला गालबोल लावले ते जहांगीरपुरी हिंसाचाराने (Jahangirpuri violence). यामुळे देशात सध्या धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. तर याघटनेमुळे अख्या देशातील सुरक्षा यंत्रणा हायअलर्ट झाल्या असून प्रत्येक राज्याने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांना (Delhi Police) रस्त्यावर उतरवले आहे. देशाची राजधानी […]

Delhi Hanuman jayanti violence : मिरवणुकीत मोठ्या आवाजात संगीत, घोषणाबाजी आणि नमाजची वेळ... असं काय घडलं?
जहांगीरपुरी हिंसाचारImage Credit source: TV9
| Updated on: Apr 17, 2022 | 10:44 AM
Share

Delhi Hanuman jayanti violence : देशाच्या काणोकोपऱ्यात हनुमान जयंती जोरदार करण्यात येत असतानाच याला गालबोल लावले ते जहांगीरपुरी हिंसाचाराने (Jahangirpuri violence). यामुळे देशात सध्या धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. तर याघटनेमुळे अख्या देशातील सुरक्षा यंत्रणा हायअलर्ट झाल्या असून प्रत्येक राज्याने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांना (Delhi Police) रस्त्यावर उतरवले आहे. देशाची राजधानी दिल्लीत हनुमान जयंतीच्या दिवशी मिरवणुकीत गोंधळ झाला. मिरवणुकीत दोन्ही बाजू आमनेसामने आल्याने एकमेकांवर निशाणा साधत विटा आणि दगडांचा मारा करण्यात आला. तर दंगलखोर जमावाने पोलिसांनाही सोडले नाही. या घटनेत सहा पोलिसांसह एकूण सात जण जखमी झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तर या घटनेनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

मिरवणुकीत गोंधळ

राजधानी दिल्लीत हनुमान जयंतीच्या दिवशी मिरवणुकीत गोंधळ झाला. त्यात गोळीबार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या गोळीबारात एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबाराच्या सहा राऊंड्स झाल्या. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. जहागीरपूरच्या परिसरातून सकाळी मिरवणूक शांततेत निघाली होती मात्र संध्याकाळी त्यात गोंधळ उडाला. सायंकाळी 5.40 वाजता काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गोंधळ सुरू झाला. हीच वेळ आहे जेव्हा लोक इफ्तारच्या आधी नमाज अदा करायला मशिदीत जात होते. दरम्यान मशिदीसमोरच हाणामारी सुरू झाली. ही मिरवणूक मशिदीजवळ आल्यावर लोकांनी घोषणाबाजी सुरू केली. मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यात आले. मशिदीच्या आत भगवा ध्वज लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचाही आरोपही आहे. पण दुसरीकडे, दुसऱ्या बाजूने हे सगळे आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत. तर दुसरीकडे मिरवणुकीला ठिकठिकाणी लक्ष्य करण्यात आल्याचे म्हटले आहे.

गोळीबार झाल्याचा संशय

काही स्थानिक लोकांचे असेही म्हणणे आहे की मोठ्या आवाजातील संगीतामुळे मिरवणूक थांबवण्यात आली. तेथे दोन्ही गटात बाचाबाची झाली. त्यानंतर हाणामारी झाली. एका बाजूचे असेही म्हणणे आहे की, सकाळी या भागातून मिरवणूक निघाली खरी मात्र हाणामारी झालेली नाही. मग संध्याकाळी मिरवणूक कशाला थांबवणार? त्याचवेळी पोलिसांना मात्र गोळीबार झाल्याचा संशय आहे. कारण एका पोलीस अधिकाऱ्यालाही गोळी लागली आहे. पण सध्या याबाबत पोलीस मौन बाळगून आहेत. गोळीबाराचे सहा राउंड झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

घरांच्या छतावर दगड

दरम्यान पोलिसांनी आनखीन एक संशय व्यक्त केला आहे की, घरांच्या छतावर दगड आधीच ठेवले असावेत. त्यामुळे पोलिस घरांच्या छतावर साठलेल्या दगडांच्या खुणा शोधण्यासाठी ड्रोन वापरत आहेत. सदर घटना ही काल घडलेली असल्याने काही घरांच्या छतांवर अजूनही दगड ठेवलेले असतील. विशेष म्हणजे जहांगीरपुरी येथे झालेल्या दंगलीदरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक झाली होती.

काय घडले दुपारी 4 ते 8 वाजेपर्यंत

हनुमान जयंतीची ही शोभा यात्रा दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात दुपारी 4.30 वाजता निघाली होती. तर ही शोभा यात्रा K ब्लॉक पर्यंत जाणार होती. सायंकाळी 6 वाजता ही मिरवणूक C ब्लॉकवर पोहोचली आणि किरकोळ बाचाबाची झाली. त्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. तर संध्याकाळी 6.20 च्या सुमारास दिल्ली पोलिस नियंत्रण कक्षाला या हाणामारीची माहिती मिळाली. याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मेधा लाल घटनास्थळी पोहोचल्या. तेथे त्याच्या हातात गोळी लागली. या चकमकीत सुमारे 6 पोलीस जखमी झाले होते. 7 वाजण्याच्या सुमारास सर्व वरिष्ठ अधिकारी मोठ्या पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी पोहोचले. हिंसाचार पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी सुमारे 1 तास लागला आणि सुमारे 8 वाजेपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली.

इतर बातम्या :

Violence in Delhi : दिल्ली हिंसेनंतर उत्तर प्रदेशात हाय अ‍ॅलर्ट जारी, अनेक शहरांत फ्लॅग मार्च, जवानांचा बंदोबस्त वाढवला

‘दंगली घडवून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीचा गुणरत्नी खेळ’; ‘सामना’मधून पुन्हा भाजपावर निशाणा

Mango : यंदा आंब्याचा गोडवा दुरापस्तच, वातारवणातील बदलामुळे आंबा उत्पादनाची स्थिती काय?

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.