ट्विटरचे भारत सरकारला प्रत्युत्तर

ट्विटरचे भारत सरकारला प्रत्युत्तर(Twitter's reply to the Government of India)

ट्विटरचे भारत सरकारला प्रत्युत्तर
ट्वीटरवर आपल्या आवाजात पोस्ट करा ट्विट; बस्स तुम्हाला कराव्या लागतील या सोप्या गोष्टी

नवी दिल्ली : कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत चिथावणीखोर पोस्ट टाकल्याप्रकरणी भारत सरकारने कडक पावले उचलली आहेत. या पोस्ट टाकणारी 1,178 पाक-खलिस्तानी अकाऊंट काढून टाकण्याचे आदेश भारत सरकारने ट्विटरला दिले होते. या आदेशाबाबत आता ट्विटरने भारत सरकारला प्रत्युत्तर दिले आहे.(Twitter’s reply to the Government of India)

ट्विटरने काय उत्तर दिले?

भारत सरकारकजून नॉन-कंप्लायंस नोटिस प्राप्त झाली असून आम्ही भारत सरकारशी संपर्कात आहोत, असे ट्विटरच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. आमच्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा प्राथनिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. माहितीच्या देवाणघेवाणीचा जागतिक सकारात्मक स्तरावर परिणाम होतो, यावर आमचा ठाम विश्वास आहे. तसेच ट्विट्स प्रवाहही सुरु राहिला पाहिजे. अशा तक्रारींबाबत आम्ही ती योग्य ती कारवाई करतो. मात्र त्याबरोरच सार्वजनिक संभाषण आणि मूलभूत तत्त्वांच्या सुरक्षेबाबत वचनबद्धता कायम राहिल हे ही सुनिश्चित करतो, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

जानेवारीतही पाठवली होती अशा हँडल्सची यादी

याआधी वादग्रस्त पोस्टप्रकरणी 31 जानेवारी रोजी आयटी मंत्रालयाने ट्विटरला 257 ट्विटर हँडल्स आणि ट्विट्सची यादी पाठवली होती. ट्विटरने हे अकाऊंट्स ब्लॉक केले होते. मात्र काही तासानंतर पुन्हा अनब्लॉक केले होते. त्यानंतर 4 फेब्रुवारी रोजी आयटी मंत्रालयाने पुन्हा 1,178 हँडल्सची यादी पाठवली. सुरक्षा बलाने हे हँडल्स पाकिस्तान आणि खलिस्तानमधून हँडल होत असल्याचे म्हटले होते. या अकाऊंट्सपैकी बहुतांश अकाऊंट्स ऑटोमेटेड बॉट्स होते, जे आंदोलनाशी संबंधित भ्रामक आणि भडकाऊ माहिती पसरवत होते, असेही सरकारने म्हटले होते. काही दिवसापूर्वी ट्विटरचे ग्लोबल सीईओ जॅक डॉर्सी यांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या परदेशी कलाकारांच्या ट्विटला लाईक केले होते.(Twitter’s reply to the Government of India)

इतर बातम्या

नितीन राऊतांचं ऊर्जा खातं नाना पटोलेंकडे जाणार? दोघेही एकाच वेळेस सोनियांच्या भेटीला

Bihar Cabinet Expansion | बिहारमध्ये नितीशकुमारांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; सर्वाधिक मंत्रिपदं कुणाकडे?

Published On - 2:09 pm, Tue, 9 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI