Vice Presidential Election 2025 : भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण ? कशी होते निवड ? पगार किती ? जाणून घ्या एका क्लिकवर
Vice President Election 2025: आज उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत असून देशाला आज संध्याकाळ नवे उपराष्ट्रपती मिळतील. 10 वजाता मतदान सुरू होईल, 5 वाजता ते संपेल आणि मग मतमोजणी होऊन निकाल लागेल.

साधारण दोन महिन्यांपूर्वी, म्हजे जुलैमध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. प्रकृतीचे कारण सांगत आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी नमूद केलं आणि तेव्हापासूनच उपराष्ट्रपतींची खुर्ची रिकामी होती. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज संसद भवनात सकाळी 10 ते संध्याकाी 5 या वेळेत मतदान होणार आहे. देशाला आजच नवीन उपराष्ट्रपती मिळणार आहेत. ही निवडणूक लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांमध्ये एकल हस्तांतरणीय मतदान प्रणालीद्वारे घेतली जाते.
या निवडणुकीच्या निमित्ताने भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण ? निवड कशी होते ? पगार किती ? उपराष्ट्रपतींचे अधिकार काय असतात ?, अशा काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.
उपराष्ट्रपती निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी, निवडणूक आयोग, राज्यसभा सचिवालय आणि प्रत्येक संसदीय सचिव यांचा त्यात सहभाग असतो. उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींनंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च संवैधानिक पद भूषवतात. ते राज्यसभेचे अध्यक्ष (Chairman) देखील असतात. जर त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रपती पद रिक्त झाले तर ते कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून काम पाहतात. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो, जो वाढवता देखील येतो.
भारतात कशी होते उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक ?
भारतात, उपराष्ट्रपतीची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते. त्यात लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य (निवडून आलेले आणि नामनिर्देशित) असतात.
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक Proportional रिप्रेझेंटेशन प्रणाली वापरून प्रमाणित सिंगल ट्रान्स्फरेबल व्होटिंग प्रणाली अंतर्गत घेतली जाते. यामध्ये, खासदार त्यांच्या पसंतीच्या उमेदवारांना अनुक्रमे मतदान करतात. जर पहिल्या पसंतीने कोटा पूर्ण केला नाही, तर मते पुढील पसंतीच्या उमेदवाराकडे हस्तांतरित केली जातात.
कधी होते निवडणूक ?
उपराष्ट्रपतींनी जर अचानक कोणत्याही कारणामुळ राजीनामा दिला, म्हणजेच पद अचानक रिक्त झाले, तर संविधानानुसार (कलम 63(2)) लवकरात लवकर निवडणुका घ्याव्या लागतात. उपराष्ट्रपती पदासाठी सध्याची निवडणूक पावसाळी अधिवेशनानंतर नियमांनुसार होत आहे.
उपराष्ट्रपतींचे वेतन किती ?
उपराष्ट्रपती पदासाठी स्वतंत्र वेतनाची तरतूद नाही. राज्यसभा अध्यक्ष म्हणून त्यांना दरमहा 4 लाख रुपये वेतन दिले जाते. तसेच त्यांना निवास, वैद्यकीय सुविधा, प्रवास (विमान, रेल्वे), कार्यालयीन खर्च, सुरक्षा, टेलिफोन सेवा आणि पेन्शन यासारख्या सुविधा दिल्या जातात. पेन्शनची पातळी मागील पगाराच्या 50 % आहे.
किती असतो कार्यकाळ ?
उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो आणि पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता असते. जर कार्यकाळ संपल्यानंतरही नवीन पदाधिकारी नियुक्त झाला नाही तर ते काम करत राहतात.
उपराष्ट्रपतींचे अधिकार आणि कर्तव्य
उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात – कामकाजाचे आचरण, शिस्त, सदस्यांची अपात्रता (पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत) यासारख्या बाबींवर अंतिम अधिकार त्यांच्याकडे असतात. मृत्यू, राजीनामा किंवा इतर कारणांमुळे जर राष्ट्रपतींचे पद रिक्त झाले तर उपराष्ट्रपती हे कार्यवाहक राष्ट्रपती बनतात आणि राष्ट्रपतींचे अधिकार पार पाडतात.
कुठे राहतात उपराष्ट्रपती ?
आज ज्यांची निवड होईल ते उपराष्ट्रपती हे भारताचे 14 वे उपराष्ट्रपती असतील. त्यांची नवी दिल्लीतील उपराष्ट्रपतींच्या एन्क्लेव्हमध्ये राहण्याची सोय होईल. हे सेंट्रल व्हिस्टा री-डेव्हलपमेंट प्रोजेक्ट अंतर्गत बांधलेले एक आधुनिक कॅम्पस आहे.
देशाचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते ?
सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती (1952 ते 1962 ) होते. नंतर त्यांनी राष्ट्रपती म्हणूनही काम पाहिले.
