AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्याच्या भारत बंदमध्ये काय सुरु आणि काय बंद? वाचा सविस्तर

उद्या 25 कोटींहून अधिक कर्मचारी सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि कॉर्पोरेट समर्थक धोरणांविरोधात आंदोलन करणार आहेत. भारत बंददरम्यान काय सुरु आणि काय बंद राहणार याबाबत माहिती जाणून घेऊयात.

उद्याच्या भारत बंदमध्ये काय सुरु आणि काय बंद? वाचा सविस्तर
bharat band details
| Updated on: Jul 08, 2025 | 7:07 PM
Share

देशभरातील 25 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांनी उद्या (9 जुलै) भारत बंदची हाक दिली आहे. याचा परिणाम संपूर्ण देशावर जाणवणार आहे. उद्या 25 कोटींहून अधिक कर्मचारी सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि कॉर्पोरेट समर्थक धोरणांविरोधात आंदोलन करणार आहेत. यामुळे सामान्य जनतेचे हाल होण्याची शक्यता आहे. या भारत बंददरम्यान काय सुरु आणि काय बंद राहणार याबाबत माहिती जाणून घेऊयात.

या संघटनांनी पुकारला बंद

देशातील AITUC, HMS, CITU, INTUC, INUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF आणि UTUC या कामगार संघटनांनी बंद पुकारला आहे. तसेच संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी कामगार आघाडी या शेतकऱ्यांच्या संघटनांनीही या संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून या बंदला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. मात्ऱ, भारतीय मजदूर संघ या बंदमध्ये सहभागी होणार नाही.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत?

कर्मचाऱ्यांनी सरकारकडे चार कामगार संहिता थांबवण्याची मागणी केली आहे. यात कामगारांना संघटना बनवण्याचा आणि संपावर जाण्याचा अधिकार देण्याची माहणी करण्यात आली आहे. 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांसाठी अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी सरकारी रिक्त पदे भरण्याचीही मागणी करण्यात आली आहे. तसेच मनरेगाचे वेतन वाढवा आणि ते शहरी भागात वाढवा, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि नागरी सेवा मजबूत करा अशी मागणीही या संघटनांनी केली आहे.

भारत बंदमुळे या सेवा विस्कळीत होण्याची शक्यता

  • बँकिंग आणि विमा सेवा
  • टपाल सेवा
  • कोळसा खाणकाम आणि औद्योगिक उत्पादन
  • सरकारी सार्वजनिक वाहतूक सेवा
  • सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्सवर परिणाम होण्याची शक्यता
  • ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोर्चे निघणार, त्यामुळे नागरिकांवर परिणाम होणार

काय सुरु राहणार?

  • भारत बंद दरम्यान शाळा आणि महाविद्यालये खुली राहणार आहेत.
  • खाजगी कार्यालये
  • वैद्यकीय सेवा
  • रेल्वे सेवांवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे गाड्या उशिराने धावण्याची शक्यता
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.