PHOTO | ‘पोलका डॉट’ ते ‘निरमा गर्ल’, ‘शेवंता’च्या नव्या लूकने चाहते घायाळ!
'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'शेवंता'च्या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरांत लोकप्रिय झाली.
Oct 05, 2020 | 4:10 PM
'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'शेवंता'च्या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरांत लोकप्रिय झाली.
अपूर्वा अस्सल मुंबईकर! रुपारेल महाविद्यालयात शिकत असतानाच तिला पहिल्या मालिकेसाठी विचारणा झाली होती.
अभिनय क्षेत्रात येणे हीच नियती होती, असे मानणाऱ्या अपूर्वाने या क्षेत्रात येण्याबद्दल कधीच विचार केला नव्हता.
‘आभास हा’ या मालिकेतून अपुर्वाने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले.
अपूर्वा सोशल नेटवर्किंगवर चांगलीच अॅक्टीव्ह आहे. सोशल मीडियातून ती आपले फोटो शेअर करत असते.
अपूर्वाचा घारे डोळे तिच्या सौंदर्यात भर घालतात.
‘शेवंता’ साकारल्यानंतर ती सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
अपूर्वाचा 'निरमा गर्ल' लूक चाहत्यांना भलताच आवडला होता.