AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोविंदा-करिश्माचं तुफान रोमॅटिंक गाणं, पण एक चूक आजही प्रेक्षकांना कळाली नाही, 29 वर्षांपासून तेवढंच प्रसिद्ध

गोविंदा आणि करिश्मा या जोडीने बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे. पण त्यांच्या एका सुपरहिट चित्रपटातील गाण्यात एक मोठी चूक झाली. पण ही चूक आजपर्यंत कधीही प्रेक्षकांना देखील कळाली नाही.

| Updated on: Jun 17, 2026 | 3:43 PM
Share
90च्या दशकात बॉलिवूडमध्ये काही मोजक्याच जोड्या होत्या ज्या बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत होत्या. यामध्ये अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जोडीचा देखील समावेश आहे. दोघांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले त्यासोबतच त्यांची गाणीही प्रेक्षकांना खूप आवडली. आजही लोकांच्या फेव्हरेट प्लेलिस्टचा ते भाग आहेत. दोघांच्या एका अशाच मजेदार रोमँटिक गाण्याबद्दल आम्ही सांगणार आहोत. या गाण्यात एक मोठी चूक झाली होती. पण २९ वर्षांपासून लोक या चुकीकडे दुर्लक्ष करत आहेत. या गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार समीर अनजान यांनी लिहिले होते. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी या गाण्याशी संबंधित एक अतिशय मनोरंजक किस्सा सांगितला.

1 / 5
सर्वात आश्चर्यजनक बाब म्हणजे, हे गाणे आपण सर्वांनी किती तरी वेळा ऐकले आणि गुणगुणवले असेल, पण कधीही त्यातील बोल आणि त्यातील चूक कोणालाही पकडता आली नाही. आता जेव्हा गीतकार समीर यांनी याचा खुलासा केला, तेव्हा लोकांचे लक्ष या गोष्टीकडे गेले. या गाण्याला कुमार सानू आणि अलका याग्निक यांनी आपल्या आवाजात गायले आहे. तर त्याचे संगीत आनंद-मिलिंद यांनी कंपोज केले आहे. आम्ही १९९७ साली आलेल्या सुपरहिट चित्रपट ‘हीरो नंबर १’ मधील गाणे ‘मैं तुझको भगा लाया हूं तेरे घर से, तेरे बाप के डर से’ याबद्दल बोलत आहोत.

2 / 5
समीर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, त्यांनी अगदी सहज या गाण्याच्या काही ओळी दिग्दर्शकांना ऐकवल्या होत्या. दिग्दर्शक डेव्हिड धवन यांना त्या ओळी इतक्या आवडल्या की, त्यांनी चित्रपटात ठेवण्याचा हट्ट धरला. समीर यासाठी पूर्णपणे तयार नव्हते. समीर यांनी डेव्हिड धवन यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला होता की, हे गाणे चित्रपटाच्या कथानकानुसार पूर्णपणे चुकीचे ठरेल. त्यांनी सांगितले होते की, चित्रपटात ज्या अभिनेत्रीच्या भूमिकेला बापच नाही. अशा स्थितीत गाण्यात ‘तेरे बाप के डर से’ अशा ओळी लिहिणे पूर्णपणे निरर्थक आणि विचित्र होते.

3 / 5
समीर यांना भीती होती की, या लॉजिकच्या कमतरतेमुळे लोक त्यांना वेडे समजतील. पण दिग्दर्शक आपल्या मतावर ठाम होते. चित्रपटाच्या दिग्दर्शकाला आपल्या आवडीवर इतका विश्वास होता की, त्यांनी गीतकार समीर यांना सांगितले होते की, जर कोणी या गाण्याच्या लॉजिकवर प्रश्न विचारला तर ते कायमचे दिग्दर्शन सोडून देतील.

4 / 5
शेवटी समीर यांना त्यांची गोष्ट मान्य करावी लागली. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, चित्रपट रिलीज झाल्यानंतर आजतागायत कोणत्याही प्रेक्षकाचे या गोष्टीकडे लक्ष गेले नाही की, बाप नसलेल्या भूमिकेत हे गाणे कथानकात कसे बसले? दिग्दर्शकाचा हा डाव पूर्णपणे यशस्वी ठरला आणि हे गाणे लोकांच्या जिभेवर चढले. आजही लोक कोणताही प्रश्न न विचारता मजेत हे गाणे ऐकतात. डेव्हिड धवन यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. केवळ ६.७ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात सुमारे ३० कोटी रुपयांची बंपर कमाई केली. विशेषतः ‘मैं तुझको भगा लाया हूं...’ हे गाणे आजही युट्युबवर धमाल माजवत आहे, ज्याला आतापर्यंत १३४ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

5 / 5
Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं