इंदापूर तालुक्यातील पळसदेव नजीक असलेल्या शेलारपट्टा परिसरातील अशोक केवटे यांच्या शेततळ्यातील पाच टन मासे अचानक मृत्युमुखी पडले आहेत.
रूपचंद जातीचे हे मासे अज्ञात इसमाने विषारी औषध पाण्यात टाकून मारल्याचा संशय असून या शेतकऱ्याने इंदापूर पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली आहे.
केवटे यांनी त्यांच्या शेततळ्यात आठ महिन्यांपूर्वी रूपचंद जातीचे तीस हजार बीज सोडले होते.
सध्या या माशांचे वजन 500 ते 700 ग्रॅम झाले होते, मात्र रात्री अचानक अज्ञात इसमाने पाण्यात विषारी औषध टाकल्याने सुमारे पाच टन मासे मृत्युमुखी पडले.
मासे मेल्यामुळे शेतकऱ्याचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.