AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजस्थानच्या वाळवंटात एकमेकांत जीव गुंतला, ऑस्ट्रेलियाची प्रेयसी तब्बल 50 वर्षानंतर येतेय भेटायला, वाचा अजरामर प्रेमाची कहाणी

राजस्थानमधील एक प्रियकर आपल्या प्रेयसीला तब्बल 50 वर्षानंतर भेटणार आहे. (rajasthan jaisalmer marina love story)

| Updated on: Apr 04, 2021 | 2:02 PM
Share
असं म्हणतात की प्रेमाला वयाची, देशाची अट नसते. प्रेम कधीही कोणासोबतही होऊ शकतं. याचीच प्रचिती आता पुन्हा एकदा आली आहे. राजस्थानमधील एक प्रियकर आपल्या प्रेयसीला तब्बल 50 वर्षानंतर भेटणार आहे. या प्रियकराचे वय 82 वर्षे आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याची प्रेमिका ही ऑस्ट्रेलिया देशातली असून तिचं नाव मरीना आहे.  राजस्थानमधील 82 वर्षीय प्रियकर सध्या सुरक्षा रक्षकाचं काम करतो. (Photos: IG- haumansofbombay)

1 / 5
याविषयीची सविस्तर माहिती ह्यूमन ऑफ बॉम्बे ऑफिशियल या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिलेली आहे. या पेजवर दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा रक्षक आणि ऑस्ट्रेलीयाची मरीना यांची प्रेमकहानी राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील कुलधरा गावातील आहे. 1970 च्या दशकात ऑस्ट्रेलियाची मरीना भारतातील राजस्थान फिरायला आली होती. राजस्थान फिरत असताना ही तरुण मुलगी जैसलमेरमधील या तरुणाच्या प्रेमात पडली होती. सत्तरच्या दशकात हा सुरक्षा रक्षक तडफदार आणि अगदीच तरुण दिसायचा.

2 / 5
या प्रेमकहानी विषयी 82 वर्षीय सुरक्षा रक्षकाने सविस्तर सागितले आहे. "जेव्हा मी मरीनाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी 30 वर्षांचा होतो. मरीना तेव्हा राजस्थानमध्ये वाळवंट पाहायला आली होती. पाच दिवसाच्या यात्रेवर ती आली होती. या यात्रेदरम्यान मी तिच्यासोबत होतो. त्यावेळी मी तिला उंटावर कसं बसायचं हे शिकवलं होतं. याच काळात आम्ही एकमेकांवर प्रेम करुन बसलो होतो," असं  या सुरक्षा रक्षकाने सांगितलं आहे.

3 / 5
मरीना पूर्ण पाच दिवस राजस्थानमध्ये राहिली होती. त्यानंतर ती पुन्हा ऑस्ट्रेलियाला परतली. जाताना माझं तुझ्यावर प्रेम असल्याचं ती या सुरक्षा रक्षकाला म्हणाली होती. पण त्यावेळी सुरक्षा रक्षक तिला उत्तर देऊ शकला नव्हता. मात्र, काही दिवसानंतर तो 30 हजार रुपयांचं कर्ज काढून ऑस्ट्रेलियाच्या मरीनाला भेटायला गेला होता. पण, लग्न करुन ऑस्ट्रेलियातच राहण्याचा मरीनाने आग्रह धरल्यामुळे तिथून निघून आल्याचं या सुरक्षा रक्षकाने सांगितलं.

4 / 5
  दरम्यान, ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर या माणसाने कुलधारा येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम केलं. तसेच लग्नसुद्धा केलं. सध्या या सुरक्षा रक्षकाला दोन मुलं आहेत. या मुलांची लग्न झालेली आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीचं निधन झालं. एका दिवशी अचनाक ऑस्ट्रेलियाच्या जुन्या प्रेमिकेचं या सुरक्षा रक्षकाला पत्र आलं. ऑस्ट्रेलियाची मरीना या सुरक्षा रक्षकाला तब्बल 50 वर्षानंतर पुन्हा भेटायला येत आहे. विशेष म्हणजे मरीनाने अजूनही लग्न न केल्याचं हा सुरक्षा रक्षक सांगतोय. तब्बल 50 वर्षानंतर जुनी प्रेमिका त्याला पुन्हा भेटायला येत असल्यामुळे या 82 वर्षीय सुरक्षा रक्षकाला सध्या 21 वर्षांचा तरुण असल्यासारखं वाटत आहे.

5 / 5
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.