Marathi News Photo gallery Acharya chanakya suggestions for selection of life partner know what chanakya niti says
तर घटस्फोट झालाच म्हणून समजा, चाणक्य नीतीमधील तो गुप्त संदेश, दुर्लक्ष केल्यास आयुष्यभर पश्चात्ताप!
आचार्य चाणक्य यांनी लग्नाआधी काय काळजी घ्यावी, जोडीदार निवडताना कोणती चूक करू नये, याबाबत महत्त्वाचे काही संदेश आणि संकेत दिलेले आहेत. याकडे कधीच दुर्लक्ष करू नये, अन्यथा तुम्हाला आयुष्यभर पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते.
आचार्य चाणक्य यांना राजकारण, अर्थशास्त्रातील खूप ज्ञान होतं. आयुष्य सुंदर, सुखी जगण्यासाठी काय करायला हवं, याबाबतही त्यांनी बऱ्याच काही गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. दरम्यान, चाणक्य यांनी लग्नाबाबत काही मोलाचे सल्ले दिलेले आहेत. ते काय आहेत, हे जाणून घेऊ या...
1 / 5
तुमचा जोडीदार तुमच्यासोबत आयुष्यभर राहणार की नाही, हे काही गोष्टींवरून लगेच स्पष्ट होते. हे संकेत नेमके कोणते आहेत, ते जाणून घेऊ या. तुमच्या वैवाहिक आयुष्यात असे संकेत दिसत असतील तर वेळीच सावध व्हायला हवे.
2 / 5
तुमचा जोडीदार फक्त दिसायला सुंदर असून चालत नाही. तुमचा जोडीदार जीवनातील चढ-उताराकडे कशा पद्धतीने पाहतो, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. तुमच्या जोडीदारात अहंकार, गर्व असे दुर्गून असतील तर तुमचे लग्न शेवटपर्यंत टिकण्याची शक्यता कमी आहे, असे म्हटले जाऊ शकते.
3 / 5
तुमचा जोडीदार त्याच्या आयुष्यातील काही गोष्टी लपवत असेल, तुम्हाला अंधारात ठेवून काही गोष्टी करत असेल तर तुमच्या नात्यात भविष्यात वितुष्ट निर्माण होऊ शकते, असे समजावे. त्यामुळे जोडीदार निवडताना यो गोष्टींची काळजी घ्यावी.
4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.