‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या घोषणेनंतर सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी घेतली आशा भोसले यांची भेट

आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि त्यासाठी आपण सर्वांचे आभारी आहोत. पण महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार वेगळा आहे कारण हा माझ्या मातीने केलेला माझा गौरव आहे. अशी भावना आशादीदींनी व्यक्त केल्या. (After the announcement of 'Maharashtra Bhushan' award, Cultural Affairs Minister Amit Deshmukh met Asha Bhosale)

1/6
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड करणे हा राज्य सरकारचा बहुमानच असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. तर ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेलं कौतुक आहे, या शब्दात श्रीमती आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

2/6
राज्य शासनाचा 2021 सालचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. त्याबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आज सकाळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची त्यांच्या लोअर परळस्थित निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले.

3/6
 यावेळी संगीतकार राहुल रानडे यांच्यासह सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते.

4/6
देशमुख यांनी यावेळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना पुष्पगुच्छ, आशा भोसले यांच्या कारकिर्दीवर आधारित ‘सुवर्णरंग’ हे पुस्तक भेट म्हणून देण्यात दिलं.

5/6
आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि त्यासाठी आपण सर्वांचे आभारी आहोत. पण महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार वेगळा आहे कारण हा माझ्या मातीने केलेला माझा गौरव आहे. अशी भावना आशादीदींनी व्यक्त केल्या.

6/6
त्या पुढे म्हणाल्या, हा पुरस्कार जाहीर होणे म्हणजे घरच्यांकडून माझे कौतुक झाले आहे असे मी मानते. या पुरस्कारासाठी मी राज्य शासनाची आभारी आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI