AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alia-Ranbir Kapoor Diwali: 250 कोटींच्या आलिशान बंगल्यात आलिया-रणबीरची पहिली दिवाळी; लेक राहासोबत लक्ष्मीपूजन

Alia-Ranbir Kapoor Diwali: तब्बल 250 कोटी रुपयांच्या बंगल्यात आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने यंदाची दिवाळी धूमधडाक्यात साजरी केली आहे. यावेळी त्यांची लेक राहा कपूरने विशेष लक्ष वेधून घेतलं.

| Updated on: Nov 09, 2026 | 12:23 PM
Share
बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपं आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची यंदाची दिवाळी खास ठरली. लग्नानंतरच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर करणाऱ्या या जोडप्याने यंदा आपल्या नव्या आलिशान घरात पहिल्यांदाच दिवाळी साजरी केली. जवळपास 250 कोटी रुपये किंमत असल्याचं सांगितलं जाणारं त्यांचं 'कृष्णा राज' बंगला दिवाळीनिमित्त रोषणाईने उजळून निघाला होता.

1 / 7
या सेलिब्रेशनचे काही खास फोटो आलियाने सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यात त्यांची लाडकी लेक राहा कपूरने चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. आलिया आणि रणबीर यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये मुंबईतील पाली हिल परिसरातील नव्या घरात प्रवेश केला होता.

2 / 7
कपूर कुटुंबाच्या इतिहासाशी नातं सांगणाऱ्या या बंगल्याचं नाव 'कृष्णा राज' असं आहे. रणबीरचे आजी-आजोबा राज कपूर आणि कृष्णा कपूर यांच्या नावावरून या घराला हे नाव देण्यात आलं आहे. सहा मजली असलेल्या या आलिशान घरात आधुनिक सजावटीसोबतच पारंपरिक भारतीय शैलीची झलक पाहायला मिळते.

3 / 7
यंदा या घरात पहिल्यांदाच दिवाळी साजरी करताना आलिया-रणबीरने पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन केलं. या पूजेत त्यांची लेक राहा आणि रणबीरची आई नीतू कपूरदेखील सहभागी झाल्या होत्या.

4 / 7
दिवाळीच्या खास प्रसंगी आलियाने हलक्या हिरव्या रंगाचा सुंदर लेहेंगा-चोळी परिधान केला होता. त्यावर गोल्डन वर्क, मॅचिंग श्रग, माथापट्टी आणि आकर्षक कानातल्यांनी तिचा लूक खुलून दिसत होता. तर रणबीर पांढऱ्या कुर्ता-पायजम्यात दिसला. राहानेही वडिलांप्रमाणे पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. आलियाने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये राहा आई-वडिलांना प्रेमाने किस करताना दिसते. या क्षणाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

5 / 7
या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये कपूर कुटुंबाने दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. आलिया, रणबीर आणि नीतू कपूर यांनी घरातील ऋषी कपूर यांच्या मोठ्या छायाचित्रासमोर एकत्र फोटो काढला. या फोटोमधून कुटुंबातील भावनिक नातंही दिसून आलं.

6 / 7
दरम्यान, दिवाळीनिमित्त रणबीर, आलिया आणि नीतू कपूर यांनी बंगल्याच्या बाल्कनीतून बाहेर जमलेल्या पापाराझींनाही शुभेच्छा दिल्या. रणबीरने हात हलवत आणि फ्लाइंग किस देत फोटोग्राफर्सचं अभिवादन केलं.

7 / 7
Follow Us
गोकुळच्या संघर्ष मोर्चाला वकिलांचाही पाठिंबा! अनेक वकील....
Gokul : गोकुळच्या संघर्ष मोर्चाला वकिलांचाही पाठिंबा! कोल्हापुरातील अनेक वकील थेट रस्त्यावर; सरकारी हस्तक्षेपाविरोधात एकजुटीने सहभाग
गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणकंदन; 10 फुटी कोल्हापुरी....
Gokul Protest : गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणकंदन; 10 फुटी कोल्हापुरी पायताण, यमराजाची वेशभूषा अन्..., सतेज पाटलांच्या मोर्चाची राज्यभर चर्चा
रस्त्यावरची लढाई लढणार सतेज पाटील यांचा थेट इशारा...
Gokul : रस्त्यावरची लढाई लढणार सतेज पाटील यांचा थेट इशारा
राज्याच्या राजकारणात काय घडतंय, गंमत बघायची; राऊतांचं सूचक विधान....
Sanjay Raut : राज्याच्या राजकारणात काय घडतंय, त्याची गंमत बघायची; संजय राऊतांचं सूचक विधान, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
गोकुळमध्ये आतापर्यंत काय घडलं? VIDEO बघाच...
Gokul : गोकुळमध्ये आतापर्यंत काय घडलं? VIDEO बघाच...
उद्धव ठाकरे आज सिल्व्हर ओकवर; शरद पवारांची घेणार भेट, राष्ट्रवादीच्या
Uddhav Thackeray Meets Sharad Pawar : उद्धव ठाकरे आज सिल्व्हर ओकवर; शरद पवारांची घेणार भेट, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरही चर्चा होणार?
दिवाळीच्या फटाक्यांचा लोकलला फटका, विरार-नालासोपाऱ्यादरम्यान सिग्नल...
Western Railway : दिवाळीच्या फटाक्यांचा लोकलला फटका, विरार-नालासोपाऱ्यादरम्यान सिग्नल यंत्रणा ठप्प; लोकल 15 ते 30 मिनिटे उशिराने
CM फडणवीस विरोधी बाकावरच जास्त शोभून दिसतात! अंधारे असं का म्हणाल्या?
Sushma Andhare On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस विरोधी बाकावरच जास्त शोभून दिसतात! सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?
त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवस्थानांना धमकीचा ईमेल; मंदिरांच्या....
Nashik : त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवस्थानांना धमकीचा ईमेल; मंदिरांच्या सुरक्षेत वाढ, पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; खेरवाडीत AQI 264 वर, तर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; खेरवाडीत AQI 264 वर, तर....