AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वय विसरायला लावणारी मैत्री! आशा पारेख, हेलेन, वहीदा रहमान व्हेकेशन मोडवर; हिल स्टेशनवर घालवतायत निवांत वेळ

आशा पारेख यांच्या आयुष्यात जेव्हा एकटेपणा आणि नैराश्याचा कठीण काळ आला, तेव्हा वहीदा रहमान आणि हेलेन यांनी त्यांना आधार दिला. या दोघींनी आशा पारेख यांना एकटं पडू दिलं नाही. प्रसिद्धी, यश आणि वय यापलीकडे जाऊन नाती जपता येतात, हे या तिघींच्या मैत्रीतून दिसतं.

| Updated on: Oct 11, 2026 | 9:37 AM
Share
बॉलिवूडमध्ये स्टारडम, स्पर्धा आणि प्रसिद्धीच्या झगमगाटात अनेक नाती काळाच्या ओघात मागे पडतात. मात्र, काही मैत्री अशी असते, जी वर्षानुवर्षे टिकून राहते आणि काळासोबत आणखी घट्ट होत जाते. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, हेलेन आणि वहीदा रहमान यांची मैत्री याचं उत्तम उदाहरण आहे.

1 / 5
या तिघी सध्या शहरातील गोंधळापासून दूर एका हिल स्टेशनवर सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. आशा पारेख यांनी सोशल मीडियावर या खास सहलीची झलक शेअर केली असून, त्यांचे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. वयाची कोणतीही मर्यादा मैत्रीच्या आनंदाला रोखू शकत नाही, हेच या तिघींनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.

2 / 5
आशा पारेख यांनी इन्स्टाग्रामवर वहीदा रहमान आणि हेलेन यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तिघीही एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत. फोटोसोबत आशा पारेख यांनी आपल्या जिवलग मैत्रिणींसोबत प्रवास करणं आणि त्यांच्यासोबत निवांत क्षण घालवणं नेहमीच आनंददायी असल्याचं म्हटलं आहे.

3 / 5
आशा पारेख, वहीदा रहमान आणि हेलेन या तिघींना बॉलिवूडच्या ‘गोल्डन गर्ल्स’ म्हणूनही ओळखलं जातं. आपल्या कारकिर्दीच्या काळात तिघीही लोकप्रिय होत्या. चित्रपटसृष्टीत यश मिळवताना त्यांच्यात स्पर्धा किंवा मत्सरापेक्षा परस्पर आदर आणि जिव्हाळ्याचं नातं अधिक महत्त्वाचं राहिलं.

4 / 5
एकत्र जेवणं, वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणं आणि देश-विदेशात फिरायला जाणं, अशा अनेक गोष्टींमधून त्यांनी आपली मैत्री जपली आहे. विशेष म्हणजे, इतकी वर्षं चित्रपटसृष्टीत काम करूनही या तिघींनी एकाच चित्रपटात एकत्र काम केलेलं नाही. तरीही त्यांच्यातील मैत्रीचा धागा कायम मजबूत राहिला आहे.

5 / 5
Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे