PHOTO | दररोज 14 ते 16 तास उपवास करतो वरुण धवन, सोशल मीडियावर सांगितला डाएट प्लॅन

वरुण धवनने यापूर्वी देखील सांगितले आहे आणि आता देखील सोशल मीडियावर नुकत्याच झालेल्या संभाषणादरम्यान त्याने आपल्या फिटनेसचे रहस्य काय आहे आणि आपल्या आहारात काय घेतो याबद्दल सविस्तरपणे सांगितले आहे.

1/7
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) याने बॉलिवूडमध्ये ‘सुपरस्टार’ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. तो बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांचा भाग असतो. त्याने केवळ त्याच्या नृत्यानेच प्रेक्षकांची माने जिंकली नाहीतर, काही चित्रपटांमध्ये गंभीर पात्रेही साकारली आहेत, ज्यांना चाहत्यांकडूनही खूप प्रेम मिळालं आहे.
2/7
पण अभिनेत्याबद्दल अजून एक गोष्ट आहे जी चाहत्यांना खूप आवडते. ते म्हणजे त्याचा फिटनेस आणि व्यक्तिमत्त्व. याविषयी वरुण धवनने यापूर्वी सांगितले आहे आणि आता देखील सोशल मीडियावर नुकत्याच झालेल्या संभाषणादरम्यान त्याने आपल्या फिटनेसचे रहस्य काय आहे आणि आपल्या आहारात काय घेतो याबद्दल सविस्तरपणे सांगितले आहे.
3/7
इंस्टाग्रामवर 'आस्क मी एनिथिंग' सत्रादरम्यान वरुण धवन म्हणाला की, मी दररोज 14 ते 16 तास उपवास करतो. मी माझ्या दिवसाची सुरुवात कॉफीने करतो. त्यानंतर मी अंडी, पांढरे आमलेट आणि ओट्स खातो. माझ्या आहारात हिरव्या भाज्या आणि चिकन देखील सामील आहेत. याशिवाय मी मखाणे खातो आणि भरपूर पाणी पितो.
4/7
काही दिवसांपूर्वी अभिनेत्याने आपल्या आगामी ‘भेडिया’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. हा एक भयपट असणार आहे. या चित्रपटाद्वारे वरुण धवन पुन्हा एकदा कृती सॅनॉनसोबत दिसणार आहे.
5/7
नुकतेच कृती सॅनॉनला वरुण धवनमध्ये लग्नानंतर काय बदल घडले असे विचारले गेले. यावर प्रतिक्रिया देताना कृती म्हणाली की, वरुण धवन अजूनही पूर्वीसारखाच आहे आणि त्याच्यात कोणताही बदल झालेला नाही. मात्र तो आता थोडा अधिक परिपक्व झाला आहे.
6/7
वरुण धवन हा 'जुग जुग जिओ' या चित्रपटातही दिसणार आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्याला कोरोना झाला होता. या चित्रपटात तो कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्यासोबत दिसणार आहे.
7/7
2021 वर्ष वरुणसाठी अनेक प्रकारे खास ठरले आहे. यावर्षी त्याने काही विशेष लोकांच्या उपस्थितीत त्याने मैत्रीण नताशा दलालशी लग्न केले. कोरोना कालावधीत लॉकडाऊन असल्यामुळे दोघे घरीच एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.