PHOTO | क्रिकेटमधील एक विक्रम, 17 वर्षानंतरही कुणाला मोडता आला नाही, हा दिग्गज फलदांज तीन दिवस खेळत होता

ब्रायन लाराचा हा विक्रम गेल्या 17 वर्षामध्ये कुणालाही मोडता आला नाही. (Brian Lara 400 Runs )

1/5
brian lara
12 एप्रिल 2004 रोजी वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लाराने इंग्लंडविरुद्ध शानदार फलंदाजी करत 400 धावांचा विक्रम नोंदविला होता. कसोटी क्रिकेटमध्ये लाराने त्याच्या नावावर बरेच मोठे विक्रम नोंदवले आहेत, परंतु हा विक्रम त्यापैकी सर्वात विशेष आहे.
2/5
brian lara 1
लाराने 61 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि सामन्याच्या दुसर्‍या दिवशी 131 चेंडूत शतक ठोकण्यात यश आले. यानंतर लाराने 199 199 चेंडूत 150 धावा ठोकल्या आणि त्यानंतर 260 चेंडूत द्विशतक केले. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत लाराने त्रिशतक गाठले. तिसर्‍या दिवशीही वेस्ट इंडीजने फलंदाजी सुरू ठेवली आणि ब्रायन लाराने 494 चेंडूत आपले 350 धावा पूर्ण केले. यानंतर पुढील 12 ओव्हरमद्ये त्याने आपले 400 धावा पूर्ण केल्या.
3/5
lara
वेस्ट इंडीजने 202 ओव्हरमध्ये 5 विकेटवर 751 धावांचा डोंगर उभा केला. यानंतर इंग्लंडचा संघ फलंदाजीला आला त्यांचा डाव 285 धावांवर संपला. इंग्लंडकडून अ‍ॅन्ड्र्यू फ्लिंटॉफने 102 आणि मार्क बुचरने 52 धावा केल्या. वेस्ट इंडीजने पुन्हा इंग्लंडला फलंदाजी दिली पण इंग्लडचा संघ दुसऱ्या डावात बाद झाला नाही. अशा प्रकारे हा सामना अनिर्णित राहिला.
4/5
lara
लाराने यापूर्वी 375 धावा 1994 मध्ये केल्या होत्या. मात्र, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडननं 380 धावा केल्या होत्या.
5/5
Brian Lara News
हा विक्रम लारानं पुन्हा 5 महिन्यानंतर हेडनचा विक्रम मोडला. ब्रायन लाराचा हा विक्रम गेल्या 17 वर्षामध्ये कुणालाही मोडता आला नाही.