AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून रोज अंधार आकाशातील तारे पाहणारा..; गौरव मोरेसाठी छाया कदम यांची खास पोस्ट

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरव मोरे यानं नुकतंच स्वत:चं घर घेतलं. यानिमित्त अभिनेत्री छाया कदम यांनी इन्स्टाग्रामवर त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. 'फिल्टरपाड्याचा बच्चन' असं नाव त्याने त्याच्या घराला दिलं आहे.

| Updated on: Apr 09, 2026 | 9:47 AM
Share
'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणून ओळखला जाणारा गौरव मोरे यानं नुकतंच मुंबईत हक्काचं घर घेत आपलं मोठं स्वप्न पूर्ण केलं. गौरवच्या या यशाचा आनंद त्याच्या चाहत्यांना आणि इंडस्ट्रीतल्या कलाकारांनाही आहे. अभिनेत्री छाया कदम यांनी गौरवसाठी सोशल मीडियावर अत्यंत खास पोस्ट लिहिली आहे.

1 / 5
या पोस्टमध्ये छाया कदम यांनी लिहिलंय, 'स्वप्न अस्वस्थ करतात. स्वप्न लढायला शिकवतात. स्वप्न जगायला शिकवतात आणि तिच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमिताभ बच्चनजींच्या जुन्या हेअर स्टाइलच्या प्रेमात लहानापासून वेडा असलेला गौरव पुढे त्याच्या अशाच स्वप्नांचं एक घर उभं करतो. फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून रोज अंधार आकाशातील तारे पाहणारा गौरव, स्वतःच्या कष्टाने आणि कामावर असलेल्या अपार निष्ठेने एक दिवस स्वतः तारा होऊन जातो.'

2 / 5
'जिद्द, चिकाटी आणि भारावलेपण घेऊन, अमिताभजींच्या प्रेमात ‘भूतनाथ’ झालेला गौरव, पुढे परिस्थितेच्या सगळ्या ‘दिवार’ तोडत,  सोबत ‘शहेनशाह’चा आत्मविश्वास घेऊन, आपल्या कामातून दरवेळी ‘शोले’ भडकवून, एक दिवस स्वतःच्या पायावर ‘डॉन’सारखा उभा राहून, असल्या नसलेल्या सगळ्या शक्यतांना ‘वजीर’ होऊन चेकमेट करतो. तेव्हा तो सगळ्यांना आपला वाटतो आणि हेच त्याचं आपलेपण गौरवला ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ करतात,' अशा शब्दांत छाया कदम यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

3 / 5
गौरवचं कौतुक करत त्यांनी पुढे लिहिलं, 'कारण या सगळ्या प्रवासात त्याच्यातला निखळ माणूस जराही हलत नाही. उलट तो अजून रोज नव्याने उजळत जातो. आणि काय कमाल आहे, ज्या झोपडपट्टीच्या मातीत गौरवचं बालपण गेलं त्याच झोपडपट्टीच्या जागेवर आज उंच बिल्डिंग बांधली गेली आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये असलेल्या एका सुंदर घरात गौरवच गृहप्रवेश झाला. गौरव.. तुझ्या एका जिद्दीने खूप जणांना स्वप्न पाहायची तू हिंमत दिलीस. अजून खूप मोठा हो. इतका मोठा हो की एक दिवस तुझ्या यशाचा ‘जलसा’ करायचा आनंद आम्हा सगळ्यांना मिळू दे.'

4 / 5
'तुझ्या पुढील सगळ्या प्रवासासाठी शुभेच्छा. आणि घरासोबतच आयुष्यात आलेल्या जोडीदाराच्या ही खूप साऱ्या शुभेच्छा. खूप गोड आहे प्रियांका. बाकी, तुझ्यातला ‘नटवरलाल’ असा अभिनय क्षेत्रातले तुझे ‘सरकार राज’ अबाधित ठेवो. खूप खूप प्रेम. शुभेच्छा आणि शेवटचं.. परंपरा - प्रतिष्ठा और अनुशासन.. मैं हूँ फिल्टरपाड्याचा बच्चन,' असा गौरवचा गाजलेला डायलॉग त्यांनी पोस्टच्या अखेरीस लिहिला.

5 / 5
Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?