AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमच्या घरात मी फराळ बनवतो आणि ती…; मराठी अभिनेत्याचं विधान चर्चेत

Actor Kailas Waghmare on Diwali Faral : दिवाळी म्हटलं की बालपणीच्या प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी असतात. पण जेव्हा संसार सुरु होतो. तेव्हा मात्र या गोष्टी बदलत जातात. याच बदलावर अभिनेता कैलास वाघमारे याने त्याचं मत मांडलं आहे. दिवाळी फराळ बनवण्याबाबतचं त्याचं मत सध्या चर्चेत आहे.

| Updated on: Nov 09, 2024 | 10:39 AM
Share
अभिनेता कैलास वाघमारे आणि अभिनेत्री शिवाली परब यांचा 'पाणीपुरी' नावाचा सिनेमा येत्या 15 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत कैलासने दिवाळी घरगुती कामं करण्याबाबतचं मत व्यक्त केलं.

1 / 7
एका मुलाखती दरम्यान कैलासला फराळ बनवायला बायकोला मदत करतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा आमच्या घरी मी फराळ बनवतो आणि बायको मला मदत करते, असं कैलास म्हणाला. त्यांचं हे विधान सोशल मीडियावर चर्चेत आहे.

2 / 7
कैलास आणि अभिनेत्री मीनाक्षी राठोड यांनी काही वर्षांआधी लग्नगाठ बांधली. कॉलेजमध्ये या दोघांची पहिली भेट झाली. त्यानंतर नाटकाच्या ग्रुपमध्ये प्रेमात पडले आणि मग या दोघांनी लग्न केलं. आता त्यांना एक मुलगी देखील आहे. या त्रिकोणी कुटुंबाला सांभाळणं ही फक्त जबाबदारी नव्हे तर माझी आवड आहे, असं कैलास म्हणतो.

3 / 7
मी जाहीरपणे ही गोष्ट सांगतो की, मला किचनमध्ये काम करायला आवडतं. मी स्वत: हून पुढाकार घेऊन सगळं उत्साहाने आणि आवडीने करतो, असं कैलास म्हणाला.

4 / 7
काही पुरुष मंडळी म्हणतील की हा आला आम्हाला शिकवायला. पण ते लोक म्हणतात की मी दिवाळीत फराळ बनवायला मदत केली. पण माझं म्हणणं असं आहे की ठीक आहे तुम्ही मदत केली. पण मग त्यात वेगळं असं काय केलं? उलट रोज मदत करा. दररोजच्या जगण्याची ती गोष्ट आहे. रोज सगळ्यांना जेवण लागतं तर उलट रोज अशी मदत केली पाहिजे. रोजची कामं मग तिने एकटीनेच का करावं?, असं कैलास म्हणाला.

5 / 7
मी घरातली सगळी कामं करतो. आमच्या मुलीला सांभाळण्यापासून घरातली सगळी कामं करतो. ते मी फक्त जबाबदारी म्हणून मी करत नाही तर मी आवड म्हणून या गोष्टी करत असतो. त्यात मला काहीही वेगळं वाटत नाही, असं कैलास म्हणाला.

6 / 7
घरातील कामं करणं ही केवळ स्त्रीयांची जबाबदारी नाही, असं मत कैलासने मांडलं. त्यांच्या या मताशी शिवालीदेखील सहमत झाली. नेटकऱ्यांनीही कैलासच्या या विधानाला सहमती दर्शवली आहे.

7 / 7
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.