रांगड्या जोडीचा ‘राजेशाही’ थाट, राणा दा आणि पाठक बाईंचं नवं रॉयल फोटोशूट पाहिलंत का?

राणादासोबत तिची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अगदी काहीच महिन्यांपूर्वी ही मालिका ऑफ एअर गेली आहे. मात्र, तरीही चाहत्यांच्या मनातील ‘अंजली बाई’ आणि ‘राणा दा’ यांच्याबद्दलचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही.

1/6
छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतील अंजलीच्या भूमिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) घराघरात पोहोचली. खरं तर अंजलीपेक्षा ‘पाठकबाई’ हीच तिला मिळालेली खरी ओळख.

2/6
राणादासोबत तिची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अगदी काहीच महिन्यांपूर्वी ही मालिका ऑफ एअर गेली आहे. मात्र, तरीही चाहत्यांच्या मनातील ‘अंजली बाई’ आणि ‘राणा दा’ यांच्याबद्दलचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही.
राणादासोबत तिची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अगदी काहीच महिन्यांपूर्वी ही मालिका ऑफ एअर गेली आहे. मात्र, तरीही चाहत्यांच्या मनातील ‘अंजली बाई’ आणि ‘राणा दा’ यांच्याबद्दलचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही.
3/6
मालिका आता ऑफ एअर गेली असली तरी प्रेक्षक आपल्या आवडत्या कलाकारांना खूप मिस करत आहेत. मालिका आता सुरु नसली, तरी मालिकेतील कलाकार देखील या मालिकेच्या गोड आठवणीत रममाण झालेले दिसत आहेत.

4/6
नुकतेच या मलिकेतील या प्रसिद्ध जोडीने एक नवे रॉयल फोटो शूट केले आहे. या फोटोशूटमध्ये दोघेही एका वेगळ्याच अंदाजात दिसले आहेत. या फोटोत अक्षया सुंदर लेहेंगा तर, हार्दिक जोशी धोतर आणि कुर्ता अशा पारंपारिक लूकमध्ये दिसले आहेत. पारंपारिक अंदाज असला तरी, त्याला एक फॅशनचा नवा तडका लावण्यात आला आहे. या दोघांचं हे रॉयल वेडिंग फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे.

5/6
‘राणा दा’ साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. झी मराठी वाहिनीवर सुरु झालेली नवी मालिका ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?’ (Tuzhya Majhya Sansarala Aani Kay Hava) यात हार्दिक मुख्य भूमिकेत दिसत आहे.

6/6
‘तुझ्यात जीव रंगला’नंतर आता अभिनेता हार्दिक जोशी ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ असं म्हणणार आहे. या मालिकेत नवोदित अभिनेत्री अमृता पवार मुख्य भूमिकेत दिसत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI