Happy Birthday Hina Khan | काश्मीरी असूनही कधीच मिळाली नाही ‘काश्मीरी’ मुलीची भूमिका, हिना खानला वर्णभेदाचाही करावा लागला होता सामना!

‘बिग बॉस’ विजेती अभिनेत्री हिना खान (Hina Khan) आज (2 ऑक्टोबर) आपला वाढदिवस साजरा करत आहे. हिना खानने छोट्या पडद्यावरून आता मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली आहे. ती पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर ‘हॅक’ या चित्रपटात दिसली आणि तिचा उत्कृष्ट अभिनय देखील प्रेक्षकांना खूप आवडला.

1/6
‘बिग बॉस’ विजेती अभिनेत्री हिना खान (Hina Khan) आज (2 ऑक्टोबर) आपला वाढदिवस साजरा करत आहे. हिना खानने छोट्या पडद्यावरून आता मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली आहे. ती पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर ‘हॅक’ या चित्रपटात दिसली आणि तिचा उत्कृष्ट अभिनय देखील प्रेक्षकांना खूप आवडला. पण हिना खान एकावेळी अशा टप्प्यातून गेली, जेव्हा तिला नाकारण्यात आले होते.

2/6
अलीकडेच, हिना खानने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, तिला चक्क एका चित्रपटातून काढून टाकण्यात आले. चित्रपटाचे नाव उघड न करता हिना खान म्हणाली की, त्या भूमिकेसाठी काश्मिरी मुलीची गरज होती.

3/6
अभिनेत्री हिना खान स्वतः काश्मिरची आहे आणि तिथली बोलीभाषा चांगली जाणते, पण तरीही तिला ही भूमिका देण्यात आली नाही. याचे कारण होते तिचा सावळा रंग. हिना खानने ज्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते, त्या भूमिकेसाठी एका उजळ वर्णाच्या मुलीची गरज होती. त्यामुळे हिना खानला नकाराला सामोरे जावे लागले होते.

4/6
अलीकडे हिना खानने या प्रकाराबद्दल बोलताना सांगितले की, या नकारामुळे ती खूप दु:खी झाली होती. कारण ती त्या भूमिकेसाठी परिपूर्ण होती, पण तरीही तिला चित्रपट मिळाला नाही.

5/6
अभिनेत्री हिना खान असेही म्हणते की, मी हार मानणार नाही आणि अभिनेत्री म्हणून नेहमीच प्रयत्न करत राहीन. हिना खानने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरील हिट शो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ने केली होती.

6/6
अनेक वर्षे शोचा भाग राहिल्यानंतर हिना खानने चित्रपटांमध्ये एंट्री घेतली. ती ‘हॅक’ आणि ‘लाईन्स’मध्ये दिसली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI