Photo : छोट्या गंगूबाईचं रुपडं बदललं, आता दिसते स्लीम ट्रीम

सलोनी एका मुलाखतीत म्हणाली की, टीव्हीवरील तिचा प्रवास हा आतापर्यंतचा सर्वात चांगला प्रवास होता, मात्र मोठी झाल्यावर तिला वजन जास्त असल्यामुळे खूप टीका आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागला. (Little Gangubai's appearance has changed, now she looks slim)

Jun 23, 2021 | 5:07 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: VN

Jun 23, 2021 | 5:07 PM

कॉमेडी सर्कसमधील गोंडस गंगूबाई आठवते? ती गंगूबाई म्हणजे सलोनी दैनी आता मोठी झाली आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे तिनं स्वत:ला पूर्णपणे बदललं आहे.

1 / 7
'कॉमेडी सर्कस महासंग्राम' या हिट कॉमेडी रिअॅलिटी शोमध्ये गंगूबाई म्हणून तिच्या प्रेमळ अंदाजानं प्रेमात पाडणारी छोटी मुलगी सलोनी दैनी आता मोठी झाली आहे.

2 / 7
सलोनी एका मुलाखतीत म्हणाली की, टीव्हीवरील तिचा प्रवास हा आतापर्यंतचा सर्वात चांगला प्रवास होता, मात्र मोठी झाल्यावर तिला वजन जास्त असल्यामुळे खूप टीका आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

3 / 7
सलोनी म्हणाली की, ‘भैंस लग रही है’, ‘कितनी मोटी है’, ‘कितना खायेगी,’ यासारख्या कमेंट्स मिळत होत्या. पण मला ते वाचण्यात खूप मज्जा वाटते. मी अशा कमेंट्स माझ्या मित्रांसोबत वाचते आणि आम्ही खूप हसतो. कधीकधी मला कमीपणा वाटतो, मात्र मी पटकन पुढे निघून जाते.

4 / 7
ती पुढे म्हणाली, मी आयुष्यातील चांगल्या गोष्टींकडे लक्ष देते आणि अशा लोकांचा विचारच करत नाही. लॉकडाऊन दरम्यान आता मी 22 किलो वजन कमी केलं आहे.

5 / 7
लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळी ती 80 किलो होती. अशावेळी तिनं ठरवलं की तिचं वजन कमी करावं लागणार आहे. ती म्हणाली की तिचं लक्ष्य तंदुरुस्त आणि निरोगी राहण्याचं आहे. तिनं योग्य आहार घेतला आणि दररोज व्यायाम केला. सलोनीचं वजन आता 58 किलो आहे.

6 / 7
लॉकडाऊनमध्ये तिचं वजन कमी झाले आहे.

लॉकडाऊनमध्ये तिचं वजन कमी झाले आहे.

7 / 7

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें