AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samantar : एकाचे कर्म, दुसऱ्याचे भविष्य, नियती नियंत्रित होईल? कसा असेल कुमारचा ‘समांतर’ प्रवास?

सीझन 2 मध्ये चक्रपाणीने कुमारला डायरी दिली आहे, ज्यात त्यांच्या आयुष्याचा तपशील आहे. यात एक नवीन स्त्री कुमारच्या आयुष्यात येणार असल्याचे भाकीत केले आहे.(Samantar 2, How will be Kumar's 'Samantar' journey?)

| Edited By: Anish Bendre | Updated on: Jun 22, 2021 | 10:38 AM
Share
असं म्हणतात नशिबात जे लिखित आहे, ते होतचं… मग कितीही नशीब नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला तरीह…. मात्र तुमच्या भविष्यात काय लिहून ठेवलंय, हे जर तुम्हाला आधीच कळलं, तर तुम्ही ते भविष्य पुन्हा लिहू इच्छिता? तुम्हाला असं वाटतं का, तुम्ही ते बदलू शकता? नियतीच्या विचित्र मार्गावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अपेक्षित अशी एमएक्स ओरिजनल सीरीज ‘समांतर’ आपला सीझन 2 (Samantar 2) घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाली आहे.

1 / 5
यात पुन्हाएकदा हरहुन्नरी अभिनेता स्वप्नील जोशी (Swwapnil Joshi) ‘कुमार महाजन’च्या भूमिकेत दिसणार असून नितीश भारद्वाज (Niteesh Bhardwaj), सई ताम्हणकर (Saie Tamhankar) आणि तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

2 / 5
टीझरमुळे प्रेक्षकांच्या मनात ‘समांतर’  सीझन 2 विषयी आधीच खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. तर आता ‘समांतर 2’चा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कुमार महाजनच्या बाबतीत काय चूक झाली असेल, याचा प्रेक्षकांना अंदाज बांधण्यास सांगून, एखाद्या माणसाचे कर्म दुसऱ्याचे भविष्य कसे असेल, हे यात अधोरेखित केले आहे.

3 / 5
सीझन 1 चे कुतूहलजनक कथानक म्हणजे कुमार महाजनने सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेतला, जो आधीच कुमारचे जीवन जगला होता आणि येणाऱ्या काळात काय घडणार आहे, हे तो सांगू शकत होता. सीझन 2 मध्ये चक्रपाणीने कुमारला डायरी दिली आहे, ज्यात त्यांच्या आयुष्याचा तपशील आहे.

4 / 5
यात एक नवीन स्त्री कुमारच्या आयुष्यात येणार असल्याचे भाकीत केले आहे. त्यानंतर कुमारचा नशिबाचा शोध सुरु होतो. या डायरीचा अंदाज चुकवण्यासाठी कुमारचा सर्वतोपरी प्रयत्न सुरु असतानाही, या गूढ स्त्रीचा कुमारच्या आयुष्यात प्रवेश होतो. ही गूढ स्त्री कोण आहे आणि चक्रपाणीने आपल्या डायरीत नमूद केल्याप्रमाणे कुमारला नाशिबाचा सामना करावा लागणार का, याचा शोध या 10 भागांच्या थ्रिलर सीरीजमध्ये घेतला जाणार आहे.

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार