PHOTO | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती, सर्वपक्षीय नेत्यांकडून अभिवादन

आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती आहे (Dr. Babasaheb Ambedkar 130th Jayanti).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:05 PM, 14 Apr 2021
1/9
आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती आहे. यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांनी चैत्यभूमी स्मारक येथे विनम्र अभिवादन केले.
2/9
कोरोना संकट काळात डॉ. बाबासाहेबांच्या उदारमतवादी विचारांचं, मानवतावादी शिकवणीचं पालन करुन देशहितासाठी, समाजाच्या भल्यासाठी सर्वांनी त्यांची जयंती घरीच साजरी करा,असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.
3/9
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त भायखळा येथे महापौर निवासस्थानी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
4/9
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज जालना येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.
5/9
सतेज पाटलांनीही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त आज कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
6/9
7/9
भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी आज पंढरपूर येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार प्रशांत परिचारक, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
8/9
भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज पंढरपूर येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.
9/9