Fashion | बॉलिवूडसह हॉलिवूड दिवांचा ‘टाय डाय’ लूक, पाहा फॅशनचा नवा ट्रेंड…

90च्या काळात गाजलेला ‘टाय डाय’ फॅशन ट्रेंड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बॉलिवूडसह हॉलिवूड अभिनेत्री देखील हा ट्रेंड फॉलो करत आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:05 PM, 21 Jan 2021
1/5
मनोरंजन विश्वातील सगळ्याच दिवांना नेहमीच स्टायलिश आणि ट्रेंडी लुक्स हवे असतात. फॅशनच्या या जगतात याच ट्रेंडच्या शोधात जुन्या फॅशन पुन्हा एकदा नव्याने समोर येतात. यापैकीच एक 90च्या काळात गाजलेला ‘टाय डाय’ फॅशन ट्रेंड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बॉलिवूडसह हॉलिवूड अभिनेत्री देखील हा ट्रेंड फॉलो करत आहेत.
2/5
अनन्या पांडे तिच्या फॅशनेबल लूकसाठी ओळखली जाते. अलीकडेच अनन्याने टाय डाय केलेल्या पॅन्ट्स परिधान केल्या होत्या. तिने ट्यूब टॉपसह टाय-डाय ट्राऊजर परिधान केला होता.
3/5
शिल्पा शेट्टी कोणत्याही शैलीत स्वत:ला सहजपणे कॅरी करते. अलीकडेच सुट्ट्यांचा आनंद घेताना टाय-डाय जंप सूटमध्ये दिसली होती.
4/5
अभिनेत्री जाह्नवी कपूरने देखील नुकताच टाय-डाय टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातल्या होत्या. विकेंड ट्रीपला तुम्ही देखील जाह्नवीचा हा लूक ट्राय करू शकता.
5/5
फक्त बॉलिवूडच नाही, तर हॉलिवूड स्टार्सनीदेखील टाय-डाय ट्रेंड फॉलो केला होता. हॉलिवूड अभिनेत्री कायली जेनरने देखील टाय-डाय जंपसूट परिधान केला होता.