AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महागडी व्हिस्की असो वा देशी दारू! रोजचा ‘एक पेग’ही सुरक्षित नाही, या कॅन्सरचा वाढतो धोका

माफक प्रमाणात मद्यपान करणे आरोग्यासाठी हानिकारक नसते, असा अनेकदा समज असतो, परंतु एका ताज्या अभ्यासाने हा समज पूर्णपणे चुकीचा सिद्ध केला आहे.

| Updated on: Mar 17, 2026 | 6:23 PM
Share
'थोडं-फार' दारू पिण्याने आरोग्याला काही नुकसान होत नाही? किंवा कधीतरी मित्रांसोबत बीयर किंवा व्हिस्कीचा आनंद घेणे सुरक्षित आहे? असा जर तुमचा समज असेल तर सावध व्हा. एका नव्या अभ्यासाने हा सर्व भ्रम पूर्णपणे नष्ट केला आहे.

1 / 8
संशोधकांना आढळून आणले आहे की, भारतीय पुरुषांसाठी दारुच्या पदार्थांची कोणतीही मात्रा सुरक्षित नाही. महागडी व्हिस्की असो वा गावाकडची देसी दारू, रोज फक्त ९ ग्रॅम दारु (सुमारे एक स्टँडर्ड ड्रिंक) पिण्यानेही गालाच्या आतील भागातील कॅन्सरचा (बकल म्यूकोसा कॅन्सर) धोका ५०% पर्यंत वाढतो.

2 / 8
या अभ्यासात २०१० ते २०२१ या कालावधीत भारतातील सहा वेगवेगळ्या कॅन्सर केंद्रांमधील डेटा गोळा करण्यात आला. यात १,८०३ पुरुषांचा समावेश होता ज्यांना बकल म्यूकोसा कॅन्सर झाला होता आणि त्यांची तुलना १,९०३ अशा पुरुषांशी केली गेली ज्यांना कॅन्सर नव्हता. अभ्यासात बीयर, व्हिस्की यांसारख्या विदेशी दारूबरोबरच देसी दारू, ठर्रा, महुआ यांसारख्या स्थानिक दारूंचाही अभ्यास करण्यात आला. महिलांमध्ये दारू सेवन खूप कमी आढळल्याने हा अभ्यास फक्त पुरुषांवर केंद्रित ठेवण्यात आला.

3 / 8
तंबाखू आणि इतर घटक बाजूला ठेवल्यानंतरही, दारू पिणाऱ्या पुरुषांमध्ये कॅन्सरचा धोका न पिणाऱ्यांच्या तुलनेत ६८% जास्त आढळला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जे लोक दिवसाला ९ ग्रॅमपेक्षा कमी (म्हणजे एक स्टँडर्ड ड्रिंकपेक्षा कमी) दारु पितात, त्यांच्यातही कॅन्सरचा धोका लक्षणीयरीत्या जास्त आढळला. यावरून स्पष्ट होते की दारु सेवनाची कोणतीही मर्यादा सुरक्षित नाही.

4 / 8
अभ्यासात आढळले की स्थानिक पद्धतीने बनवलेली दारू (देसी दारू, ठर्रा) पिणाऱ्यांना सर्वाधिक धोका आहे. देसी दारू पिणाऱ्यांमध्ये मुख कॅन्सरचा धोका दारु न पिणाऱ्यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट आढळला. तरीही बीअर आणि व्हिस्की पिणाऱ्यांमध्येही धोका सतत कायम राहिला, मग ते कितीही कमी प्रमाणात का असेल.

5 / 8
अभ्यासात दारु आणि तंबाखू यांच्यातील खोल संबंध आढळला. जे पुरुष दारु आणि तंबाखू दोन्ही वापरतात, त्यांचा धोका फक्त एकच गोष्ट वापरणाऱ्यांच्या तुलनेत खूप जास्त असतो. संशोधकांचा अंदाज आहे की बकल म्यूकोसा कॅन्सरच्या ६०% पेक्षा जास्त प्रकरणे दारु आणि चघळण्याच्या तंबाखूच्या एकत्रित वापरामुळे होतात. तर भारतात या कॅन्सरच्या सुमारे ११.३% प्रकरणे फक्त दारु सेवनामुळे होतात.

6 / 8
बकल म्यूकोसा कॅन्सर हा भारतात मुख कॅन्सरचा सर्वात सामान्य प्रकार आहे आणि यात रुग्णाच्या ५ वर्षांपर्यंत जगण्याची शक्यता फक्त ४३% आहे. चिंतेची बाब म्हणजे अभ्यासातील अनेक रुग्ण ४५ वर्षांपेक्षा कमी वयाचे होते, जे दर्शवते की कमी वयात दारूचे व्यसन भविष्यात गंभीर परिणाम आणू शकते.

7 / 8
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच डॉक्टरांच्या सल्लाने औषध-उपचार घ्यावेत.)

8 / 8
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल