AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gargi Phule: रीलस्टार कलाकार नसतात… गार्गी फुले स्पष्टच बोलल्या, नेमकं काय घडलं?

Gargi Phule: गार्गि फुले यांनी नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी रिलस्टार हे कलाकार नसतात असे स्पष्ट म्हटले आहे. पण त्या मागे नेमकं काय कारण आहे? हे देखील त्यांनी सांगितले आहे.

| Updated on: Jul 08, 2026 | 4:20 PM
Share
सध्याचे युग सोशल मीडियाचे आहे आणि यात रीलस्टार्सची धूम पाहायला मिळते. मात्र, काही दिवसांपूर्वी रीलस्टार महेश मोटे यांनी पुणे-पंढरपूर महामार्गावरील टोल नाक्यावर केलेल्या हायव्होल्टेज ड्राम्यामुळे मोठी चर्चा रंगली. "मी सर्वसामान्य माणूस नाही, रीलस्टार आहे," असे म्हणत त्यांनी टोल नाक्यावर गोंधळ घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर रीलस्टार्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांच्याबद्दल सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री गार्गी फुले यांनी रीलस्टार्सवर स्पष्ट आणि ठाम मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, रीलस्टार हे अभिनेते किंवा कलाकार नाहीत.

1 / 5
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत गार्गी फुले म्हणाल्या, "मी आधीही एक-दोन मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, रीलस्टार हे कलाकार नाहीत. ते फक्त स्टार आहेत. फॉलोअर्सची संख्या पाहून काही वाहिन्यांनी त्यांना कामे दिली, पण त्यामुळे ते कलाकार होत नाहीत. यासाठी मी खूप ट्रोलिंगला सामोरे गेले. अनेकजण म्हणाले की, आम्ही कंटेंट तयार करतो, त्यात मेहनत नसते का?

2 / 5
पुढे त्या म्हणाल्या, मी त्याची मेहनत स्वीकारते, पण जेव्हा अभिनयाचा प्रश्न येतो, तेव्हा गोष्ट वेगळी आहे. खऱ्या कलाकारांची १०-१० वर्षांची मेहनत, संघर्ष आणि शिकवण असते. फक्त 'मी अभिनेता आहे' असे म्हणून कुणी अभिनेता होत नाही."

3 / 5
टोल नाक्याच्या घटनेवर भाष्य करताना त्या पुढे म्हणाल्या, "एका रीलस्टारचा टोल नाक्यावरचा व्हिडीओ पाहून मला गंमत वाटली. तुम्ही रीलस्टार आहात म्हणजे काय? सरकारचे नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. तुम्हाला टोल द्यावा लागेल. हे फुकटात उपलब्ध आहे म्हणून लोक बघतात. यावर पैसे लावले तर हे बघणंही बंद होईल."

4 / 5
सिनेमातील यशाबद्दल बोलताना गार्गी फुले म्हणाल्या, "एका रीलस्टारचा सिनेमा आला आणि तो प्रचंड फ्लॉप झाला. कुणीही तो पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेला नाही. आज फुकटात उपलब्ध असल्याने लोक बघत आहेत, पण हे सर्कल कधी ना कधी थांबेल. खरा अभिनय हा कला आहे. तुमचे वय ८० वर्षे झाले तरी किंवा तुम्ही पाच वर्षांचे असलात तरी तो अभिनय तुमच्यातून जात नाही. तो शिकलेला आणि आत्मसात केलेला असतो."

5 / 5
Follow Us
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात खळबळ
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार