Photo : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील महिला मंडळींचा ग्लॅमरस अंदाज

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील महिला मंडळी. (Glamorous looks of women in the series ‘Tarak Mehta Ka Ulta Chashma’)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:01 PM, 25 Nov 2020
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील महिला मंडळी म्हणजेच बबीता, माधवी, कोमल, अंजली आणि रोशन यांच्या अभिनयाची नेहमीच प्रशंसा होते आणि नेहमीच चाहत्यांना त्या प्रचंड आवडतात. मालिकेत त्या अत्यंत साध्या वेशात असतात मात्र खऱ्या आयुष्यात त्या खूप स्टाईलिश आहेत.
बबीता (मुनमुन दत्त) : मुनमुन दत्त सुरुवातीपासूनच या मालिकेशी जोडलेली आहे. ती मालिकेतही बऱ्यापैकी स्टाईलिश आहे आणि वास्तविक जीवनातही ही प्रचंड ग्लॅमरस आहे.
कोमल हाथी (अंबिका रंजनकर) : अंबिका मालिकेत कोमल हाथीच्या भूमिकेत आहे. तिची मालिकेतील भूमिका एकदम सिंपल आहे आणि रिअल लाइफमध्ये सुद्धा ती सिंपल आहे.
माधवी भिडे (सोनालिका जोशी) : मालिकेत सोनालिकाची भूमिका वेगळी आहे. या मालिकेतील गृहउद्योग करणारी ती एकमेव महिला आहे. मालिकेत ती तिचं घरही सांभाळते आणि व्यवसायही. ती मालिकेत खूप साधी आहे. मात्र वास्तविक जीवनात अतिशय ग्लॅमरस आहे.
अंजलि मेहता (सुनैना फौजदार) : सुनैना फौजदार काही काळापूर्वीच या मालिकेत सहभागी झाली आहे. या मालिकेत ती अंजली तारक मेहताची भूमिका साकारत आहे. या मालिकेत तिचा लूक अगदी साधा आहे. मात्र रिअल लाइफमध्ये ती खूप स्टाईलिश आहे.
रोशन सोढ़ी (जेनिफर मिस्त्री) : मालिकेत जेनिफर मिस्त्री रोशनसिंग सोढीची भूमिका साकारत आहे. ही खूप प्रेमळ व्यक्तिरेखा आहे.