अरेरे! अतिमुसळधार पावसामुळे साचले पाणी, 300-400 दुचाकी पाण्यात बुडाल्या

Pune Heavy Rain | गेल्या दोन दिवसांपासून घाटमाथ्याच्या परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळतोय. तर मध्य महराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेकडून देण्यात आलाय.

1/4
पुणे शहरात सोमवारी संध्याकाळी परतीचा मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा जोर इतका होता की अवघ्या दोन तासांमध्ये शहरातील अनेक भाग जलमय झाले.

2/4
पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात पाणी साचले होते. या परिसरातील तुकारामशेठ शिंदे वाहनतळाचा तळमजला अवघ्या काही तासांमध्ये पूर्ण पाण्याखाली गेला.

3/4
त्यामुळे वाहनतळावर लावण्यात अलेलल्या सुमारे 300 ते 400 दुचाकींचे नुकसान झाल्याचे समजते.

4/4
गेल्या दोन दिवसांपासून घाटमाथ्याच्या परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळतोय. तर मध्य महराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेकडून देण्यात आलाय. राज्यात पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्राच्या परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI