जर तुमच्या शरीरामध्ये दिसत असतील ‘ही’ लक्षणे; तर समजून जा व्यायाम सूरू करण्याची वेळ आलीये

नियमित व्यायाम (Exercise) करण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्ही जर नियमित व्यायाम करत असाल तर तुमचे शरीर तंदुस्त (Body fit) राहाते. सोबत अनेक आजारांपासून तुमचा बचाव होतो. मात्र तुम्ही जर नियमित व्यायाम करत नसाल तर लठ्ठपणा, मधुमेह, ब्लड प्रेशर यासारखे अनेक आजार तुम्हाला होऊ शकतात. जर तुमच्या शरीरात अशी काही लक्षणे आढळली तर तुम्ही त्याच क्षणापासून व्यायाम सुरू करा. असे करणे तुमच्या फायद्याचे ठरू शकते. आज आपण अशाच काही आजारांबाबत जाणून घेणार आहोत. जे आजार तु्म्हाला नियमित व्यायाम न केल्यामुळे होऊ शकतात.

Jan 22, 2022 | 4:13 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Jan 22, 2022 | 4:13 PM

अन्न पचनाशी संबंधित  समस्या :  जर तुम्हाला अन्न पचनाशी संबंधित काही समस्या असतील तर तुम्ही नियमित व्यायाम करणे आवश्यक असते. जर तुम्ही नियमित व्यायाम केल्यास तुमचे शरीर अधिक तंदुस्त राहिल व अन्न पचनाची समस्या देखील दूर होऊ शकते.

1 / 5
ब्लड प्रेशर वाढणे : जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल, तर तो नियंत्रित करण्यासाठी काही विशेष पथ्थ पाळण्याची गरज असते. मात्र त्यासोबतच नियमित व्यायाम करणे देखील आवश्यक आहे. ब्लड प्रेशरची समस्या ही शरीरामध्ये कॅलेस्ट्रॉल वाढल्यामुळे होते. तुम्ही जर नियमित व्यायाम केला तर तुमच्या शरीरामधील कॅलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात येऊ शकते.

2 / 5
कंबर दुखीचा त्रास : जर तुम्हाला उठता, बसता कंबर दुखीचा त्रास होत असेल, कंबरीसोबतच पाठ, मान हे देखील अवयव दुखत असतील. तर तुम्ही व्यायामाला सुरुवात करावी. नियमित व्यायामामुळे तुम्हाला अशा अजारातून मुक्तता मिळू शकते.

3 / 5
 सुस्तपणा : तुम्ही देखील सुस्तपणाच्या समस्येमुळे परेशान आहात, तर आजच व्यायाम सुरू करा. व्यायामामुळे तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त कार्बोहायड्रेड साठणार नाही. त्यामुळे तुमचे वजन कमी होऊन तुम्हाला लठ्ठपणातून सुटका मिळू शकते. तसोच तुमच्यामधील आळस देखील दूर होऊन, तुम्हाला फ्रेश वाटेल. वरील सर्व माहितीही सामान्य ज्ञानावर आधारीत आहे. त्यामुळे ज्या रुग्णाला अन्य देखील काही आजार आहेत. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्यायाम करावा.

4 / 5
ताण तणावाचे नियोजन : जर तुमच्यावर काही गोष्टींचा ताण असेल, तुम्ही सतत तणावाखाली राहात असाल तर तुम्हाला व्यायामाची अधिक गरज आहे. तुम्ही नियमित व्ययामाच्या माध्यमातून ताणाचे नियोजन करू शकता.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें